शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी ‘तो’ पोलीस मुंबईत

By admin | Updated: February 28, 2017 05:11 IST

काही दिवसांपूर्वी तब्येतीवरून मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांची खिल्ली उडवली होती

मुंबई : सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी काही दिवसांपूर्वी तब्येतीवरून मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांची खिल्ली उडवली होती, ते दौलतराम जोगावत आता वजन घटविणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करून जोगावतही आपल्या सर्जरीसाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल झाले.दौलतराम यांचे वजन सध्या १८० किलो इतके आहे. जोगावत यांच्या वैद्यकीय चाचण्यांनंतर प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला सर्जरीविषयी निर्णय घेतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो टिष्ट्वटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. शोभा डे यांच्या टिष्ट्वटला मुंबई पोलिसांनीही तितकेच संयमी उत्तर दिले होते. (प्रतिनिधी)>उपचारांचा खर्च द्याशोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगाविला होता.