शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

'राजा'च्या दरबारात पोलीस- कार्यकर्त्यांत खडाजंगी

By admin | Updated: September 11, 2016 23:57 IST

दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमधील हाणामारीचे सत्र यावर्षीही सुरू आहे. शनिवारी रात्री राजाच्या दरबारातच पोलीस आणि कार्यकर्ते भिडल्याची घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ -  दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमधील हाणामारीचे सत्र यावर्षीही सुरू आहे. शनिवारी रात्री राजाच्या दरबारातच पोलीस आणि कार्यकर्ते भिडल्याची घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे. पोलिसाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे कार्यकर्त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचा आरोप मंडळाने केला आहे, तर दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

यासंदर्भात मंडळाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने शनिवारी मुंबईसह राजाच्या दराबारातही प्रचंड गर्दी झाली होती. यासंदर्भात एक महिला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यास स्टेजवर येत होती. मात्र यावेळी भायखळा पोलीस ठाण्याचे पीएसआय सत्यवान पवार यांनी पत्रकाराला रोखले. शिवाय एका पोलीस शिपाईच्यानातेवाईकांनी उलट दिशेने दर्शनासाठी सोडले. दरम्यान, मंडळाचा कार्यकर्ता रोहित श्रीवास्तव याने पत्रकाराला सोडण्यास सांगितले. यावरूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादात पवार यांनी रोहितला बेदम मारहाण केली. 

उपचारासाठी रोहितला केईएम रूग्णालयात घेऊन गेले असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे कळाले. पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडळाने केली होती. मात्र गुन्हा दाखल न करता पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकार केला. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांकडे तक्रार करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

यावर काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले म्हणाले की, मंडळाने केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या बहुतांश फौजफाटा गणेशोत्सवाच्या बंदोबस्तमध्ये व्यस्त आहे. तरी लालबागचा राजा मंडपातील सीसीटीव्हीच्या मदतीने कार्यकर्ता आणि पोलीस अधिकारी यांमध्ये झालेल्या वादाची पाहणी केली जाईल. त्यात जो कोणी दोषी आढळेल, त्यावर निश्चित कारवाई केली जाईल.

शुक्रवारपासून रविवारपर्यंत बहुतांश गणपतींसह गौरींचे विसर्जन झालेले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस लालबाग राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत अधिक भर पडणार आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच पोलिसांनाही गर्दीला आवरण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

 
आणखी वाचा 
 
 
पत्रकाराला एसीपीची धक्काबुक्की

पत्रकार उदय जाधव यांना लालबागचा राजा मंडळ परिसरात एसीपी अजय पाटणकर यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. माध्यमांसाठी असलेल्या विशेष कक्षाकडे जाताना पाटणकर यांनी अडवले. ओळखपत्र दाखवल्यानंतरही पाटणकर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप उदय जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांकडे तक्रार केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही चित्रण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.