शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ सेवेसाठी पोलीस प्रशासनाचा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप स्थापन

By admin | Updated: September 6, 2015 20:47 IST

विश्वजीत कार्इंगडे : जिल्हा अधीक्षक कार्यालयात ‘स्मार्ट फोन’ची सुविधा सुरु

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पोलिसांना मिळावी व त्या अनुषंगाने पीडितांना तत्काळ मदत पोहोचविता यावी हा उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने ८२७५७७६२१३ व ८२७५७७६२१६ या नंबरचा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप स्थापन केला आहे. गुन्ह्यातील व्हिडीओ, छायाचित्रे या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपला पाठविल्यास पोलिसांना घटनास्थळी तत्काळ पोहचण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयात ‘स्मार्ट फोन’ची सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.यावेळी कार्इंगडे म्हणाले की, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना संशयित व्यक्ति किंवा वस्तूंची माहिती तातडीने पोलिसांना देता यावी यासाठी स्मार्ट फोनची सुविधा सुरु केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा वापर करून गुन्हे नियंत्रणास हातभार लावावा. सिंधुदुर्ग पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलले आहे. नागरिकांनी स्मार्ट फोन सुविधेचा वापर केल्यास पोलिसांना प्रामुख्याने खालील मुद्यांवर तत्काळ कार्यवाही करणे सोयीचे होईल. यात रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे. ट्राफिक जाम झाल्यास त्याचे लवकरात लवकर निराकरण करणे, सण-समारंभ आणि इतर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणे, महिलांच्या छेडखानी कारवायांना प्रतिबंध करणे, घातपाती कृत्य, संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पुरविलेस अशा कारवायांना तत्काळ प्रतिबंध करणे, पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती, भूकंप आदींबाबत नागरिकांना तत्परतेने मदत करणे, एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ माहिती मिळाल्यास, गुन्हेगाराचा लवकरात लवकर शोध घेणे शक्य होईल. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीसारखे गुन्हे घडल्यानंतर त्यांची तत्काळ माहिती मिळाल्यास पोलिसांना नाकाबंदी करून गुन्हेगारांचा विनाविलंब शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे शक्य होईल. एखाद्या ठिकाणी दंगल झाल्यास त्याची तत्काळ माहिती मिळाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या जातीय दंगलीला प्रतिबंध करणे सोयीचे होईल. जिल्ह्यातील नागरिकांनी स्मार्ट फोन सुविधेचा वापर केल्यास पोलिसांना वरीलप्रमाणे तत्काळ सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. त्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात येऊन त्याठिकाणी जनतेला स्मार्ट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मेसेजींग अ‍ॅप्लीकेशनद्वारेही माहिती देता येणार आहे. (प्रतिनिधी)नावे गुप्त ठेवणारमहिलांची छेडछाड व महिलांच्या गुन्ह्यांसंबंधीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरून देता येईल. फोनवरुनही एसएमएस किंवा व्हीडीओ क्लिपद्वारे पाठविता येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि माहितीची खातरजमा करून तातडीने संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी कायदेशीर कारवाई करतील. संबंधितांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत.