शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन पॅथॉलॉजी लॅबवर पोलिसांची कारवाई

By admin | Updated: June 30, 2016 02:35 IST

परवाना निलंबित असतानाही रक्त, लघवीची चाचणी करून अहवाल देणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली

नवी मुंबई : परवाना निलंबित असतानाही रक्त, लघवीची चाचणी करून अहवाल देणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही लॅबमधून दिल्या जाणाऱ्या अहवालावर एकाच तज्ज्ञाची सही आढळली असून, प्रत्यक्षात मात्र ते तज्ज्ञ त्याठिकाणी उपस्थित नव्हते. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोलॉजिस्ट संघटनेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.ठरावीक काळासाठी परवाने निलंबित झालेल्या पॅथॉलॉजी लॅबमधून रक्त, लघवीच्या चाचणीचे अहवाल दिले जात होते. याची तक्रार महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोलॉजिस्ट संघटनेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलिसांनी संघटनेच्या मदतीने कोपरखैरणे व घणसोलीतील दोन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई केली आहे. याकरिता वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने संघटनेच्या मदतीने सापळा रचला होता. त्यामध्ये घणसोली सेक्टर ३ येथील संकल्प लॅब व कोपरखैरणे सेक्टर ५ मधील आयुष लॅबवर कारवाई करण्यात आली. तसेच सदर लॅबचे मालक सागर माळी व मेघा माळी तसेच संतोष खंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय सायनचे पॅथॉलॉजिस्ट सूर्यनाथ त्रिपाठी यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कारवाई केलेल्या दोन लॅबसह इतर काही लॅबमधून एकाच वेळी त्रिपाठी यांची सही असलेले अहवाल दिले जात असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे. परंतु एखादा तज्ज्ञ एका वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहून अहवालावर सही करू शकत नाही. यावरून अहवालावर नियमबाह्य डिजिटल सह्या असल्यामुळे संघटनेने त्यांच्याविरोधात देखील तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)