शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस’ पाटीचा सर्रास गैरवापर

By admin | Updated: May 21, 2016 03:49 IST

पोलिसांनी आपल्या खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असा शब्द किंवा संबंधित कोणतेही चिन्ह लावायचे नाही,

आकाश गायकवाड,

डोंबिवली- पोलिसांनी आपल्या खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असा शब्द किंवा संबंधित कोणतेही चिन्ह लावायचे नाही, असे परिपत्रक गृह खात्याकडून निघूनही त्याची अंमलबजावणी अद्याप कल्याण-डोंबिवलीत होताना दिसत नाही. पोलीस कर्मचारी, त्यांचे नातलगच नियम धाब्यावर बसवताना दिसत असून त्यावर कोणीही कारवाई करीत नाही. पोलीस शब्द लिहिलेली पाटी, स्टिकर्स किंवा अन्य संबंधित चिन्हांचा गैरवापर सुरू असल्याने त्याचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नातलगच हा नियम सर्रास पायदळी तुडवत असल्याचे दिसून येते. असे चिन्ह आणि पोलीस नावाची पाटी असलेली अनेक वाहने सध्या दोन्ही शहरांत फिरताना दिसतात. त्यामुळे इतरांना कायदा शिकवणारे पोलीसच तो पायदळी तुडवत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.अशी पाटी लावलेली असेल तर कोठेही सहज प्रवेश मिळतो. वाहतुकीचे नियम तोडले तर सहज सुटका होते. कारवाईत गाडी उचलली जात नाही आणि हेल्मेट-कागदपत्रे सोबत नसली तरी चालतात, अशा कारणांमुळे या पाट्या-चिन्हे लावली जातात, असे सांगितले जाते. गोल स्टिकर, की-चेन पोलिसांच्या स्टेशनरी दुकानात सहज मिळत असल्याने त्याचा दुरु पयोग वाढला होता. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यांच्या मालकीच्या किंवा खाजगी वाहनांवर पोलिसांचे चिन्ह आणि पोलीस शब्दाची पाटी लावण्यास प्रतिबंध करत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच पोलीस विभागांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने केले तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्यपालांच्या संमतीने देण्यात आले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि आपल्याच माणसांवर कारवाई कशी करायची, अशा विवंचनेत असलेल्या पोलीसदादांवर कारवाई कोणी करायची, हाच यक्षप्रश्न आहे.याबाबत, कल्याण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सयाजी डुबल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.