शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेतही पोकेमॉन गो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 19:24 IST

पाश्चिमात्य देशातील आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमची दखल विधान परिषदेलाही घ्यावी लागली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ : पाश्चिमात्य देशातील आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमची दखल विधान परिषदेलाही घ्यावी लागली. व्हर्च्युअल आणि रिअल लाईफचा मिलाफ असणा-या गेमने अनेकांना वेड लावले असले तरी त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या खेळाच्या नादात अनेकांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी, तरुणांसह या गेमची आवड असणा-यांना गेमबाबत दक्षतेच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेना सदस्या नीलम गो-हे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधान परिषदेत केली.

मोबाईल वरच्या अनेक गेम्सना पोकेमॅन गो ने मागे टाकले आहे. या खेळामध्ये स्वत:चे लोकेशन द्यावे लागते. त्यानंतर जीपीएस च्या माध्यमातून पोकेमॉनचा पाठलाग करावा लागतो. त्यामुळे अनेकदा खेळ खेळणा-याचा जीव धोक्यात येतो, असा मुद्दा नीलम गो-हे यांनी उपस्थित केला. जगभरात २२ देशांत या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशियात एक व्यक्ति हा खेळ खेळताना जावा प्रांतातील लष्कराच्या तळावर जाऊन पोहोचला होता. तर जीपीएस यंत्रणा आॅन असल्यामुळे महत्वाची माहिती बाहेर जाऊ शकते म्हणून कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. द. अमेरिकेत २मुले निर्जन ठिकाणी पोहोचल्यामुळे गोळीबाराचे बळी ठरले. अरिझोना येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना पोकेमॉन गो हा गेम खेळताना दक्षता घेण्याबाबत ईमेल द्वारे सूचना दिल्याचे गो-हे यांनी सांगितले.

त्यामुळे शासनाने या गेमचे धोके लक्षात घेऊन राज्यात सुरक्षिततेसाठी या खेळाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.पोकेमॉनचा पाठलाग लहानग्यांच्या कार्टून विश्वातील हा पोकेमॉन गेमच्या माध्यमातून स्मार्ट फोनमध्ये दाखल झाला आहे. हा गेम खेळण्यासाठी सतत जीपीएस यंत्रणा सुरू ठेवावी लागते. खेळातील पोकेमॅनला शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. सतत फिरावे लागते. जिथे पोकेमॅन दिसतो तिथे जाऊन त्याला कॅप्चर करावे लागते. त्यामुळे गेम खेळताखेळता अनेकजण रात्रीअपरात्रीसुद्धा घराबाहेर पडतात. पोकेमॅनच्या नादात वाट्टेल तिकडे जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, असेही यावेळी गो-हे यांनी सांगितले.