शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विषप्रयोग अखेर थांबला!

By admin | Updated: June 26, 2015 03:16 IST

लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर कारवाई विनोद काकडे/संजय देशपांडे ल्ल औरंगाबाद सुखना धरणात विषारी रसायन सोडणाऱ्या रॅडिको

रॅडिको कंपनी बंद : ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर कारवाई विनोद काकडे/संजय देशपांडे ल्ल औरंगाबादसुखना धरणात विषारी रसायन सोडणाऱ्या रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीला अखेर गुरुवारी शासनाने उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे रसायनामुळे गावकऱ्यांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ व शेतजमीन नापीक होत असल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. कुंभेफळसह आसपासच्या गावकऱ्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले. औरंगाबादमधील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीतून दररोज तब्बल अडीच लाख लीटर घातक रसायन बाहेर पडत होते. त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे घातक रसायन थेट भूमिगत पाइपलाइनद्वारे पाझर तलावात सोडले जात होते. सांडव्याद्वारे ते कुंभेफळ नाला आणि तेथून पंधरा किलोमीटरवर सुखना धरणात मिसळत होते. धरणातून २५ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच हजारो हेक्टर जमीनही नापीक होत चालली होती. धरणाचे पाणी पिल्याने जनावरेही दगावली होती.‘लोकमत’च्या बातमीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सलग तीन दिवस कंपनीतून निघणाऱ्या रसायनाचे, सुखनाच्या पाण्याचे आणि आसपासच्या मातीचे नमुने गोळा केले. त्याची तपासणी केली. त्यात रॅडिकोचा विषप्रयोग अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवाल व पुरावे मंगळवारी राज्याच्या पर्यावरण खात्याकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यानंतर शासनाचे आदेश मिळताच औरंगाबाद प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन थांबविण्याची नोटीस दिली. प्रत्यक्षात कंपनीतील उत्पादन पूर्णपणे बंद होण्यास रविवार उजाडू शकतो, असे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.