शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे जणांना विषबाधा

By admin | Updated: March 27, 2016 01:26 IST

तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी

महाड/दासगाव : तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.महाड तालुक्यातील कुंबळे येथील व्यवसायिक जैनुद्दीन कादरी यांच्या मुलगा नबील याचा निकाह शनिवार दुपारी पार पडला. यावेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले आणि काही तासानंतर अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या लग्नाच्या जेवणाचे कंत्राट महाडमधील ए वन कॅटरर्स यांना देण्यात आले होते. उलटी जुलाबाचा त्रास झालेल्यांमधील अनेकजण महाड तालुक्यातील असल्याने त्यांना ताबडतोब महाडमधील शासकीय रुग्णालय तसेच डॉ. देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अनेक पाहुणे महाड सोडून आपल्या गावी गेले आहेत. यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती ट्रामा केअर सेंटरचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. महाडमधील डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयात जवळपास १०० च्यावर तर डॉ. शेठ यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील अनेक रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले आहेत. कुंबळे गावाच्या शेजारी असलेल्या तुडील गावातील डॉ. ताजीर यांच्या दवाखान्यात देखील काही रुग्णांनी उपचार घेतले आहेत. याबाबत अद्याप निश्चित आकडा प्राप्त झालेला नाही. महाडमधील ज्या कुंबळे गावात ही घटना झाली त्या ठिकाणी देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी आपले एक पथक पाठवून दिले आहे. कुंबळे गावात या पथकाने प्राथमिक शाळेत रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. (प्रतिनिधी)महिला अधिककुंबळे गावासह पंचक्रोशीतील म्हाप्रळ, जुई, तुडील, वऱ्हाळी, वलंग, चिंभाव आदी गावातील अनेकांना लग्नातील जेवणावळीतून विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. मैनुद्दीन शेखनाग, मैमुना शेखनाग, आफरीन शेखनाग, आमिर शेखनाग, शगुफ्ता मुकादम, आमिर शेख आदींना अधिक त्रास झाला असला तरी आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणी महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नसमारंभातील विषबाधेबाबत पोलीस ठाण्याला सूचना दिली आहे. लग्नातील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले जातील. त्यानंतर हे नमुने मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. अहवाल आल्यावर विषबाधेचे कारण कळेल. - डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी