शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

दूध पाजूनही सापाने अखेर विषच ओकले...-भास्कर जाधव :

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

राष्ट्रवादीच्या प्रचार मेळाव्यात सर्वच पदाधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्यावर टीका

रत्नागिरी : सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे? पक्षातीलच काही मंडळींनी हा साप पोसला होता. पक्षाने सर्व काही देऊनही गद्दारी करीत पक्षाबाहेर पडला व पक्षाच्या विरोधातच गरळ ओकला. त्यामुळे रत्नागिरीतील लढत ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी असून, गद्दाराला एकदाच गाडून टाका, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केशवराव भोसले, बाप्पा सावंत, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, उमेदवार बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे, यासीन मामू आदी पदाधिकारी उपस्थित होते. जाधव म्हणाले, पक्षाने याला काय दिले नाही, दोनवेळा आमदारकी, राज्याच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद देऊनही पक्षाशी गद्दारी केली. तिसऱ्यांदा उमेदवारी देऊनही पक्षाने पैसे मागितल्याचे सांगत बदनामी करणाऱ्याला त्याची जागा मतदारांनी दाखवून द्यावी. सांमत राष्ट्रवादीतून सेनेत गेल्यावर जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांना मी विचारले, जो राष्ट्रवादीचा, स्वत:च्या कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो शिवसेनेचा होईल? त्यावर महाडिक म्हणाले, आम्ही त्यांना स्वीकारले आहेच, परंतु खांद्यावरही बसविले आहे. त्यावर मी म्हणालो, आमच्याकडे हेच झाले. काहींनी त्यांना खांद्यावर बसविले, त्यांचे कपडे घाण झाले. तुम्ही कान सांभाळा, असा सल्ला दिला आहे. मी पण २००४ मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता. मला दिलेली उमेदवारी अचानक काढून घेतली. त्यामुळे मी पक्षाच्याच कार्यालयात बसून रितसर राजीनामा दिला होता. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. येथे तर पक्षाने सर्वकाही दिले. तिसऱ्या वेळचा उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला तरी गद्दारी झाली हे न पटणारेच आहे, असेही ते म्हणाले.पक्षाने अन्याय केला, उमेदवारीसाठी पैसे मागितले असे जर भाषण करताना भास्कर जाधव रडलेपाच वर्षांपूर्वी पावसमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असताना तटकरे मला उद्देशून बोलले होते की, माझ्या निष्ठेबाबतच त्यांनी संशय घेतला होता. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झालो. पवारांवर निष्ठा असलेल्या माझ्यावर असा आरोप भर सभेत व्हावा, हे दुर्दैवी होते. त्याचक्षणी मला वाटले पक्ष सोडावा. परंतु कुमार शेट्ये यांनी मला सावरले. मात्र, माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणाऱ्यांची निष्ठा खरी की, माझी खरी, हे स्वामी स्वरुपानंद व शारदादेवीवरच सोपवले. मी गद्दार असेन तर मला शिक्षा व्हावी, जर दुसरा कोणी असेल तो जगासमोर येऊदे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी गद्दार कोण हे जगासमोर आलेच. पालकमंत्रीपदाच्या माझ्या साडेतीन वर्षांच्या काळात या माणसाने विरोधकांशी हातमिळवणी करीत मला प्रचंड त्रास दिला, असे म्हणत भास्कर जाधव ओक्साबोक्सी रडले. त्यामुळे भावविवश झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जोरदार घोषणाबाजी केली.