शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’मध्येच प्रसूती

By admin | Updated: May 19, 2016 02:12 IST

पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेस अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्याने चालक व कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस त्वरित जवळच्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेली

खडकी : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेस अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्याने चालक व कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस त्वरित जवळच्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेली. मात्र, रुग्णालयात पोहचताच महिलेची बसमध्येच प्रसूती झाली. महिलेने गोंडस मुलास जन्म दिला असून, आई आणि बाळ दोघे सुरक्षित आहेत. मैना तुकाराम भांडेकर (वय २५, रा. भोसरी, मूळ रा. रत्नागिरी) हे महिलेचे नाव आहे. पुणे मनपा ते भोसरीगाव अशी पीएमपी बस (क्रमांक एमएच १२, केक्यू १३६) पुण्याहून भोसरीच्या दिशेने चालली होती. भांडेकर या आई व भावाला भेटण्यासाठी भोसरीला बसने चालल्या होत्या. त्यांच्या सोबत तिच्या दोन मुली होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बस बोपोडीत आली. अचानक त्यांच्या पोटात कळा येऊन दुखू लागल्याने त्यांनी आरडाओरडा सुरू केला. या प्रकाराने बसमधील इतर प्रवासी घाबरले. कंडक्टर मनीषा रोकडे यांना हा प्रकार समजला. त्यांनी त्वरित चालक मुकुंद सखाराम सुगंधे यांना बस जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. सुगंधे यांनी त्वरित बस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेली. थेट रुग्णालयात बस पाहून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वाहक व कंडक्टर यांनी डॉक्टरांची भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी बसमध्येच भांडेकर यांची तपासणी केली. परिस्थिती बिकट असल्याने बसमध्ये प्रसूती झाली. भांडेकर गोंडस बाळास जन्म दिला. आई आणि बाळास त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले गेले. दोघांची तब्येत उत्तम असून, दोघे सुरक्षित आहेत. ही घटना भांडेकर यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले. तिची आई पार्वती लालजी जाधव व भाऊ दीपक जाधव रुग्णालयात पोहचले. आई व बाळ सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी हायसे वाटले. त्यांनी डॉक्टर, बसवाहक व चालक यांचे आभार मानले. भांडेकर यांना दोन मुली असून, त्यांचे पती गवंडी काम करतात. पीएमपी बसचालक रोकडे आणि कंडक्टर सुगंधे यांनी दाखविलेल्या कार्यत्परतेमुळे भांडेकर यांची सुरक्षितपणे प्रसूती झाली. त्या व त्यांचे बाळ सुरक्षित राहिले. (वार्ताहर)>कार्यकर्त्यांनी वाटले पेढे महिलेची सुरक्षितपणे प्रसूती झाल्याने आणि बाळ सुखरूप असल्याने खडकीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. महिलेची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांची देखभाल त्यांची आई करीत आहे. मंगळवारी आणि बुधवारी असे दोन्ही दिवस कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईक आणि मुलींसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय केली. काहींनी आर्थिक मदत देऊ केली. रुग्णालयात त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते मनीष बासू, अनिल दवंडे, संतोष जैन, फारुख शेख, पप्पू पिल्ले, विजय साठे, गोकुळ कदम, दमयंती शिंगारे आदींनी साह्य केले. बुधवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अमोल जगताप यांनी महिलेची विचारपूस केली. या वेळी डॉ. रणजित भोसले, विलास खांदोडे, अरुण गोडबोले आदी उपस्थित होते.