शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीकडे येणार दीड हजार बस

By admin | Updated: July 19, 2016 00:43 IST

पुणे महानगर परिवहन लिमिटेडसाठी (पीएमपीएल) १ हजार ५५० गाड्या खरेदी करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारच्या सभेत मंजुरी दिली.

पुणे : पुणे महानगर परिवहन लिमिटेडसाठी (पीएमपीएल) १ हजार ५५० गाड्या खरेदी करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारच्या सभेत मंजुरी दिली. पालिकेच्या अंदाजपत्रकात किमान ५ टक्के कपात करून ही खरेदी करावी, असा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. मात्र अशी कपात न करता ही खरेदी करण्याची कसरत स्थायी समितीच्या सदस्यांनी साधली आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुरी वाहने, उपलब्ध वाहनांमधील बरीच वाहने नादुरुस्त झालेली, काहींची मुदत संपुष्टात आलेली यातून प्रवाशांना कार्यक्षम सेवा देण्यात पीएमपीएलला अडचण येत होती. त्यामुळे पीएमपीएल व्यवस्थापनाकडून वाहनखरेदीसाठी मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पालिका प्रशासनाने त्यावर अंदाजपत्रकात ५ टक्के कपात करावी व ही खरेदी करावी, असे सुचविले होते. मात्र, सदस्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे बराच काळ हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर स्थायी समितीने त्याला सोमवारी मंजुरी दिली. त्यानुसार आता ७०० गाड्या खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य उभे केले जाईल, तर ७५० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. १०० गाड्यांची खरेदी पालिका करेल. त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात आधीच तरतूद केलेली आहे. अशा रचनेमुळे पालिकेवर कोणताही आर्थिक बोजा नव्याने पडणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. ही खरेदी पिंपरी-चिंचवड पालिका ४० टक्के व पुणे पालिका ६० टक्के याप्रमाणे होणार आहे. त्यामुळेही पालिकेला एकदम मोठा खर्च करावा लागणार नाही, असे बोडके म्हणाले. (प्रतिनिधी)>अतिरिक्त कार्यभार महापालिका आयुक्तांकडेस्थायी समितीचा हा प्रस्ताव आता पीएमपीएल व्यवस्थापनाकडे पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून वाहन खरेदीसाठी रीतसर निविदा काढून प्रक्रिया राबविली जाईल. शहरातील ही एकमेव सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा त्यातील त्रुटींमुळे कायम चर्चेत असते. पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची अलीकडेच राज्य सरकारने बदली केली आहे. त्यामुळे आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच आहे. वाहनांची सर्वांत मोठी अडचण दूर झाल्यावर तरी आता पीएमपीएलच्या सेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या पीएमपीएलकडे उपलब्ध असणाऱ्या वाहनांमधील अनेक वाहनांची प्रवासी वाहतुकीसाठी असलेली मुदत पूर्ण होत आली आहे.त्यामुळे नव्याने वाहनखरेदी होऊन ती वाहने ताफ्यात येत असतानाच काही वाहने बाद केली जातील. त्यामुळे नव्या वाहनखरेदीमुळे विशेष फायदा होणार नसल्याचे काही सदस्यांचे मत आहे.