शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पीएमपी प्रवास दुचाकीपेक्षाही महागच

By admin | Updated: August 24, 2016 01:08 IST

पीएमपी तिकिटाच्या बाबतीत सर्वसामान्यांसाठी महागडी ठरत असल्याने लाखो प्रवासी खासगी वाहनांकडे वळले असल्याचे वास्तव आहे.

सुनील राऊत,पुणे : तब्बल ६५ लाख पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी तिकिटाच्या बाबतीत सर्वसामान्यांसाठी महागडी ठरत असल्याने लाखो प्रवासी खासगी वाहनांकडे वळले असल्याचे वास्तव आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवासासाठी येणारा खर्च आणि पीएमपीचे तिकीट याबाबत शहरातील काही मार्गांवर प्रवास केला असता; बसपेक्षाही कमी खर्च येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. या पाहणीत बसच्या प्रवासापेक्षा खासगी वाहनांच्या प्रवासासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च, बसची तासन्तास वाट पाहण्यापासून सुटका, तसेच वेळेत प्रवास करणे अधिक सोपे असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट ते मनपा, कात्रज ते निगडी, स्वारगेट ते सांगवी आणि मनपा ते चंदननगर या वेगवेगळ्या मार्गावर एकाच वेळी दुचाकी आणि पीएमपीने केलेल्या प्रवासातून हा अनुभव आला. सर्वसाधारणपणे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या दुचाकी पाहता एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे ५0 किलोमीटर गाडी चालते. यावरून दुचाकीवर दोन व्यक्तींना येणारा खर्च आणि पीएमपीचे असलेले तिकीट यावरून पीएमपी पुणेकरांसाठी महागच ठरत असल्याचे दिसून येते. >का घटतेय प्रवासीसंख्या बसला वेळापत्रकच नसणे कमी अंतरासाठी न परवडणारे तिकीटबसण्यासाठी जागाच न मिळणेगाड्या कधीही बंद पडत असल्याने होणारी गैरसोय प्रवासासाठी लागणारा भरमसाट वेळगाड्यांची दुरवस्थाऐन कामाच्या वेळी ताटकळत राहावे लागणे>दुचाकीचा खर्च ६० पैसे प्रति किलोमीटरमहानगर पालिका ते स्वारगेट हे अवघे साडेतीन किलोमीटरचे अंतर आहे. पीएमपीच्या तिकिट दराच्या स्टेज नुसारच्या रचनेमुळे या प्रवासाठी पहिले दोन किलोमीटर 5 रूपये आणि नंतर त्या पुढच्या दिड किलोमीटरच्या अंतरासाठी आणखी पाच रूपये असे दहा रूपये मोजावे लागले. दुचाकी वरून प्रवास करताना या अंतरासाठी अवघे 4 रूपये 40 पैशांचा खर्च येतो. त्यातच दुचाकीवर दोन व्यक्ती असल्याने हा खर्च प्रती किलोमीटर अवघा 60 ते 65 पैसे येतो. तर पीएमपीचे थांबे, गाडी मिळे पर्यंत लागणारा वेळ, बसण्यासाठी जागा न मिळणे, या समस्यांपासूनही सुटका मिळते. प्रामुख्याने शहरातील जवळपास 80 टक्के मार्गांवर हीच स्थिती आहे.पीएमपीच्या तिकीट रचनेनुसार, प्रतिकिलोमीटर तिकिटाचा दर पाहिल्यास जवळचे अंतर महाग तर लांबच्या पल्ल्यांसाठी प्रतिकिलोमीटर दर स्वस्त आहे. याचा अनुभव घेण्यासाठी स्वारगेट ते सांगवी या १५ किलोमीटरच्या अंतरासाठी २0 रुपये प्रतिव्यक्ती. मनपा ते चंदननगर या मार्गावर १२ किलोमीटरसाठी २0 रुपये प्रतिकिलोमीटर तिकीट आहे. हाच प्रवास दुचाकीने केल्यास प्रतिव्यक्ती अनुक्रमे १0 रुपये खर्च येतो. तर प्रतिकिमी १.२८ पैसे खर्च येतो. पीएमपीचा प्रतिकिमी तिकीटखर्च १ रुपया ७0 पैसे येतो. म्हणजेच उपनगरात १ रुपया ७0 पैसे किमी दराने धावणारी पीएमपी जवळच्या ३ किमीच्या अंतरासाठी प्रवाशांकडून तब्बल साडेतीन रुपयांची आकारणी करताना दिसून येते.