शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

By admin | Updated: November 2, 2016 00:32 IST

बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे.

पुणे : बसथांब्यांवर न थांबणाऱ्या तसेच मर्यादेपेक्षा अधिक वेग असलेल्या बीआरटी मार्गावरील बसेस आणि इतर मार्गांवरील बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. या यंत्रणांमुळे नियम मोडणाऱ्या चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाई करणे शक्य झाले असून, अनियंत्रित बसेसवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ५७५ बसेसला ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. बीआरटी मार्गावरून धावणाऱ्या बसेसवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मागील वर्षभरात ‘पीएमपी’ने संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा-वाघोली, नाशिक फाटा-वाकड आणि सांगवी-किवळे या बीआरटी मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तर सुमारे १०३० बसेसवर जीपीएस यंत्रणा आहे. टप्प्याटप्प्याने जीपीएसच्या कक्षेत सर्वच बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचे नियोजन आहे. ‘बीआरटी’सह इतर मार्गावरील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरत आहे. या दोन्ही यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख करण्यासाठी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयाच्या आवारात स्वतंत्र अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून दोन्ही यंत्रणा बसविलेल्या बसेसवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. बीआरटी मार्गातून जाताना काही वेळा चालक प्रवासी असूनही बस थांब्यावर न थांबविताना तशीच पुढे दामटतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच या मार्गातून जाताना वेगाचीही मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, काही चालक वेगमर्यादेचे भान न ठेवता बस भरधाव वेगात चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. ‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे बसथांबा सोडणे किंवा वेगमर्यादा न पाळणाऱ्या चालकांवर ‘पीएमपी’ने कारवाई सुरू केली आहे. बीआरटी मार्गावरील सर्व बसेस खासगी ठेकेदाराच्या आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या चालकांच्या ठेकेदारांना आर्थिक दंड करण्यात येत आहे. या चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (प्रतिनिधी)।ठेकेदारांचा दंड भरण्यास नकार‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर ठेकेदारांना दररोज हजारो रुपयांचा दंड होऊ लागला. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील थांब्यांवर बस न थांबविणे, याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यासाठी चुकीचा निकष लावला जात असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. बसथांब्यावर प्रवाशी नसल्यास किंवा प्रवाशी उतरणार नसल्यास बस थांबवली जात नाही. तसेच बीआरटी थांब्यांवर बस थांबविण्याचा कालावधी अधिक आहे, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार देत बस न सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सध्या पीएमपी प्रशासनाने ही कारवाई थांबविली असल्याचे समजते.‘पीएमपी’कडून प्रत्येक मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. चालकांनी या मार्गावरूनच बस पुढे नेणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही काही चालक मार्ग बदलून बस पुढे नेतात. त्यामुळे मुख्य मार्गावरील प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा फटका ‘पीएमपी’ला बसतो. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे आता अशा चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे चालकांना शिस्त लागली आहे. पुढील काळात प्रत्येक बसवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.।कारवाई करणारनियंत्रण कक्षामध्ये आयटीएमएस आणि जीपीएस यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख ठेवली जात आहे. कक्षामध्ये समोर मोठा पडदा लावण्यात आला असून, त्यावर विविध रंगांमध्ये बीआरटी व इतर मार्ग तसेच त्यावरून धावणाऱ्या बसेस दिसतात. त्यावर बसेसच्या क्रमांकासह त्यांचा मार्ग स्पष्टपणे दिसतो. एखाद्या चालकाने मार्ग बदलल्यास किंवा बीआरटी मार्गात वेगाने चालल्यास, थांब्यावर न थांबल्यास पडद्यावर दिसून येते. त्याआधारे संंबंधित बसचालकावर कारवाई केली जाते.