शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या ५४४ गाड्या भंगारात ?

By admin | Updated: May 19, 2016 01:23 IST

प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या नावाखाली पीएमपीला नवीन बाराशे गाड्या घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

पुणे : प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या नावाखाली पीएमपीला नवीन बाराशे गाड्या घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. मात्र, या गाड्या कधी येतील, याचा काहीच नेम नसला तरी, पुढील एक ते दीड वर्षात पीएमपीच्या तब्बल ५४४ गाड्या भंगारात काढाव्या लागणार आहेत. या गाड्या १० वर्षे जुन्या झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले असून नवीन गाड्या नसल्याने नाईलाजास्तव या धोकादायक गाड्यांवर लाखो रुपयांचा दुरुस्तीचा खर्च करून त्या रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. ज्या गाड्या आठ लाख ४० हजार किमी धावल्या आहेत अथवा त्यांचे १२ वर्षे वापरात असलेल्या भंगारात काढण्याचे नियमावलीत असून संचालक मंडळाचा ठरावही झाला आहे.शहरात दररोज १० लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. त्यांच्यासाठी प्रत्यक्षात पीएमपीला ३ हजार गाड्यांची आवश्यकता असली तरी पीएमपीच्या मालकीच्या केवळ १२०० बस आहेत, तर ८०० बस भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. या पीएमपीच्या मालकीच्या बसमधील सुमारे ३२४ गाड्या या १० वर्षे जुन्या असून २४० बसेस या १२ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत प्रशासना ५४४ बसेस भंगारात काढाव्या लागणार असून पीएमपीकडे केवळ मालकीच्या ६५६ बसेस शिल्लक राहणार आहेत. (प्रतिनिधी)>दहाव्या वर्षीच गाडी स्क्रॅप करणे गरजेचे संचालक मंडळाच्या ठरावानुसार आठ लाख ४० हजार किमी पूर्ण किंवा १२ वर्षे वापरात असलेल्या गाड्या स्क्रॅप करणे गरजेचे आहे. मात्र गाड्या उपलब्ध नसल्याने दुरवस्था झालेल्या बसही वापरण्यात येत आहेत. नवी बस दाखल झाल्यानंतर त्यांचे मार्ग ठरविण्यात येतात. तसेच या गाड्या दोन शिफ्टमध्ये चालविण्यात येतात. शहरात आणि इतर रस्त्यांवर गाड्या चालवित असताना त्यांची होणारी झीजही वेगवेगळी आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्या तुलनेने जास्त दिवस चावतात. मात्र गाड्यांची झीज आणि त्यांच्या वापराचा विचार करता पीएमपीच्या गाड्या १० वर्षांतच स्क्रॅप करणे गरजेचे आहे.>नवीन खरेदीचे निर्णय होईनात २०१२ नंतर पीएमपीच्या ताफ्यात एकही नवीन बस उपलब्ध झालेली नाही. तत्कालीन केंद्र शासनाकडून पीएमपीला जेएनएनयुआयएम योजनेअंतर्गत ५०० बसेस देण्याचा निर्णय झालेला होता. मात्र, केंद्रात सत्ताबदल होताच ही योजना बंद झाली. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी गेला तरी नवीन बससाठी हालचाल झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत केवळ कर्ज कोणाकडून घ्यायचे, बससाठी पैसे कोण देणार, बस खरेदी करायच्या की भाडेकराराने घ्यायच्या, केवळ यावरच चर्चा सुरू आहे.