शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

ब्रेकडाऊनला पीएमपीने लावला ब्रेक

By admin | Updated: July 4, 2016 01:19 IST

बसेसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना तसेच सुटे भाग वेळेत उपलब्ध होत असल्याने पीएमपीच्या मालकीच्या बसेसचे ब्रेकडाऊन पहिल्यांदाच ४ हजारांच्या खाली आले

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना तसेच सुटे भाग वेळेत उपलब्ध होत असल्याने पीएमपीच्या मालकीच्या बसेसचे ब्रेकडाऊन पहिल्यांदाच ४ हजारांच्या खाली आले आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०१५ मध्ये ५३६० वर गेलेला हा ब्रेकडाऊनचा आकडा जून २०१६ मध्ये ३८०० वर येऊन पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांत हा आकडा ३ हजारांवर आणण्याचे उद्दिष्ट पीएमपी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. पीएमपीच्या मालकीच्या सुमारे १२०० बसेस आहेत. त्यातील ३०० बसेस बंद असून ८०० बसेस मार्गावर आहेत. या ८०० बसेसमधील सुमारे ५०० बसेस या सीएनजीवरील आहेत. या बसेस युरो ४ च्या बनावटीच्या असल्याने त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे एखादी बस बंद पडल्यास नेमकी कशामुळे बस बंद पडली आहे, हे समजण्यास मदत होते. त्यामुळे या बसच्या दुरुस्तीसाठी पीएमपीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय बसेससाठी चांगल्या गुणवत्तेचे सुटे साहित्यही वापरले जात असून या साहित्य खरेदीसाठी नियमितपणे निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय ब्रेकडाऊनची जबाबदारी डेपोप्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून ब्रेकडाऊनच्या संख्येत लक्षणीय घट होतानाचे चित्र आहे. ही घट अशीच काम ठेवण्यासाठी पीएमपीकडून मिशन ३ हजार ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअनुषंगाने उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.महिना ब्रेकडाऊनसप्टेंबर (२०१५) ५३६०आॅक्टोबर ५५०५नोव्हेंबर ४५५७डिसेंबर ४५८३जानेवारी (२०१६) ४२४१फेब्रुवारी४१७२मार्च ४४०४एप्रिल४३९२मे४०२९जून २०१६३८००