शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधानांकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून टि्वट; पर्यावरण रक्षकांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 10:50 IST

भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे.

कोल्हापूर : भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे.पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल... म्हणून काही कोल्हापूरकरांनी ‘ग्रीन व्हिजन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’च्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम राबविला आहे.

त्याची माहिती ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केली होती. ही बातमी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केली आहे. त्यानंतर देशभरातील अनेकांनी टि्वटरवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील काहींनी ही बातमी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, आदी सोशल मीडियाद्वारे देखील शेअर केली.

भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत.

शहरातील डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रमुख अशा ४५ जणांचा ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप व्यावसायिक अवनिश जैन यांनी सुरू केला. या ग्रुपसमोर जैन यांनी ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जूनमध्ये या ग्रुपने उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात केली. यानंतर आतापर्यंत शहरातील राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल, विक्रम हायस्कूल व डॉ. झाकीर हुसेन शाळेचा परिसर, आदी ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत. आॅक्टोबरअखेर पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे.

अशी आहे भिशीची संकल्पनादरमहा विशिष्ट रक्कम या ग्रुपच्या प्रमुखांकडे सदस्य जमा करतात. महिनाअखेरीस भिशीचे सदस्य एकत्र येतात. या वेळी चिठ्ठी टाकून दोन भाग्यवान सदस्यांना भिशीची रक्कम प्रदान करण्यात येते. हे सदस्य या रकमेतून रोपे आणि ट्री-गार्ड खरेदी करतात. शिवाय त्यांनीसुचविलेल्या ठिकाणी सर्व सदस्य एकत्रितपणे वृक्षारोपण करतात. देखभालीची जबाबदारीही या सदस्यांची असते आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.

वृक्षारोपणासह देखभालहीकाही महिन्यांपूर्वी सोलापूरमधील एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप पर्यावरण रक्षणासाठी या भिशीच्या पद्धतीने वृक्षारोपण करीत असल्याचे वाचनात आले. त्यावरुन ही कल्पना सुचली. केवळ रोपे लावली म्हणजे काम झाले असे नाही, तर ती जगविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आम्ही लावलेल्या झाडांची देखभालही करतो.- अवनीश जैन, प्रमुख, ग्रीन व्हिजन ग्रुप