शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना पावन करण्याची फडणवीसगिरी महागाची

By admin | Updated: February 15, 2017 02:46 IST

राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश देत पावन करून घेत आहेत. ही फडणवीसगिरी पुण्याला कुठे घेऊन जाईल

पुणे : राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश देत पावन करून घेत आहेत. ही फडणवीसगिरी पुण्याला कुठे घेऊन जाईल, सांगता येत नाही अशा टोकदार शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मांडीला मांडी लावून बसतात व परस्परांचे वाभाडेही काढतात, हे कसले राज्यकर्ते म्हणत त्यांनी भाजपा, शिवसेनेलाही धारेवर धरले.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातल्या महापालिका उमेदवारांच्या प्रचारार्थ येरवडा येथे मंगळवारी सायंकाळी पवार यांची सभा झाली. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार बापू पठारे तसेच पक्षाचे या क्षेत्रातील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, हजगाच्या नकाशावर आज पुण्याचे प्रत्येक क्षेत्रात नाव आहे. केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात देशातील पहिल्या ५ शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. या दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.’’त्यांच्या उमेदवारांच्या पदव्या म्हणजे ३०२ सारखे खुनाचे, दरोड्याचे गुन्हे, आमच्या उमेदवारांच्या पदव्या पहा. मुख्यमंत्री शिवसेनेला खंडणीबहाद्दर म्हणतात, उद्धव म्हणतात भाजपा गुंडाचा पक्ष आहे. राज्याच्या हिताची शपथ घेऊन हे सत्तेत आले, मांडीला मांडी लावून बसतात व अशी भांडणेही करतात. यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल पवार यांनी केला.शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांचेही भाषण झाले. रवींद्र माळवदकर यांनी सूत्रसंचालन केले.