शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

मिरचीपूड टाकून साडेअकरा लाख लुटले

By admin | Updated: July 28, 2016 01:16 IST

पुण्यातील व्यापाऱ्याने निपाणीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविलेली साडेअकरा लाखांची रोकड कामगारांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय

कऱ्हाड (सातारा) : पुण्यातील व्यापाऱ्याने निपाणीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविलेली साडेअकरा लाखांची रोकड कामगारांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, चोरट्यांनी पळवून नेलेली जीप कासेगावच्या हद्दीत बेवारस आढळली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे. याबाबत जगदीश जेठाराम बिश्नोई (रा. टिंबर मार्केटनजीक, पुणे) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बाडनेर जिल्ह्यातील जगदीश बिश्नोई हा सध्या प्रकाश घाशी यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. घाशी यांनी सांगितल्यानुसार जगदीश आणि त्याचा मित्र राजेश चौधरी पिकअप जीपमधून रोकड घेऊन निघाले होते. वाठारजवळ आल्यानंतर जगदीशला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने जीप थांबवून राजेशला तू गाडी चालव, असे सांगितले. राजेश जागा झाल्यानंतर जगदीश जीपमधून खाली उतरला. तो बाजूस लघुशंकेसाठी गेला असताना दुचाकीवरून तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांनी जगदीशला धक्काबुक्की केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. जगदीश आरडाओरडा करीत असतानाच दोघे जण जीपच्या दिशेने गेले. त्यांनी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या राजेशच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याला जीपमधून बाहेर ओढले. जगदीश व राजेश आरडाओरडा करीत असताना दोघांनी जीप चालू करून कोल्हापूरच्या दिशेने पोबारा केला. तर एक जण दुचाकीवरून तेथून निघून गेला. चोरट्यांनी जीपमधील साडेअकरा लाखांची रोकड लंपास करून जीप तेथून सोडून दिली होती. (वार्ताहर)महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती !पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह पथक कऱ्हाडात दाखल झाले आहे. काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.