शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उधळला

By admin | Updated: October 24, 2014 04:09 IST

पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या नातेवाईकाची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकील टोळीतील तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी जेरबंद केले.

मुंबई : पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या नातेवाईकाची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकील टोळीतील तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चॉपर असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. याच राजकीय वैमनस्यातून पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या मामाची आणि एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात येणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या मदतीने देहूरोड येथील हवेली परिसरात सापळा रचला. मिळालेल्या वर्णनाचे तीन आरोपी त्याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांना आमदाराच्या मामाचा फोटो आणि त्याचा पत्ता सापडला. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चॉपर हस्तगत केला आहे.मुख्य आरोपी हा देहूरोड येथील छोटा शकील टोळीचा म्होरक्या असून तो देहूरोड कँन्टोंमेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून देहूरोड परिसरात त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रसाठा जवळ बाळगणे आणि लूट असे २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय इतर दोन आरोपी देखील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर देखील हत्या, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)