शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी गावबैठकांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 02:42 IST

सिडको स्थापन होऊन जवळपास ४७ वर्षांचा कालावधी उलटला.

पनवेल : सिडको स्थापन होऊन जवळपास ४७ वर्षांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही नवी मुंबई परिसरातील गावांना प्राथमिक सुविधा मिळालेल्या नाहीत. ठाणे, रायगड जिल्ह्यातील गावाच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. मात्र याठिकाणीही सोयी-सुविधांची वानवाच आहे. अशीच अवस्था पनवेल महापालिकेत गावांची होऊ नये म्हणून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्धार करीत गावोगावी बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी कोपरा गावात यासंदर्भात बैठक पार पडली. अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या इंडियन सिटीझन फोरमच्या माध्यमातून या बैठका घेतल्या जात आहेत. कोपरा सुधागड विद्यालयात पार पडलेला बैठकीला ठाकूर यांच्यासह, रमाकांत पाटील, सुधाकर तोडकर, रतन भोईर, नरेश ठाकूर, शिवदास गायकर, हरेश केणी, गुरु नाथ गायकर, मुरलीधर पाटील, संतोष तांबोळी, फारूक पटेल आदींसह मोठ्या संख्येने कोपरा गावातील रहिवासी उपस्थित होते. यावेळी कोपरा गावातील समस्या, अडचणी आदींवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोपरा गावात बंद पडलेल्या टाकीचे पिण्याचे पाण्याचे काम, धुरीकरण, प्राथमिक सोयी- सुविधा, गरजेपोटी घरे आदी महत्त्वाच्या बाबीवर चर्चा झाली. यासंदर्भात गावकऱ्यांच्या समस्या जाणून यासंदर्भात पालक आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे रमाकांत पाटील यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धार यावेळी गावकऱ्यांनी केला. प्रकल्पग्रस्तांचा लढा हा कायदेशीर मार्गाने लढला जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)