शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

मराठी शाळेत उर्दूसाठी शासनाने शिक्षक दयावा....

By admin | Updated: July 10, 2016 19:12 IST

शालेय शिक्षण विभागाने मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्यासाठी शासनाने शिक्षक द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने शिक्षण सचिवांना केली आहे. शिक्षक देताना त्यांची मान्यता व वेतन अनुदानही शासनाने

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १० : शालेय शिक्षण विभागाने मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्यासाठी शासनाने शिक्षक द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने शिक्षण सचिवांना केली आहे. शिक्षक देताना त्यांची मान्यता व वेतन अनुदानही शासनाने द्यावे, अशी मागणीही निवेदनात केल्याचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले.

मोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने निवडक १०० मराठी शाळांमध्ये उर्दू शिकविण्यासाठी मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ४ जुलैला निर्गमित केला असून प्रायोगिक तत्वावर सदरचा उपक्रम राबविण्यासाठी सुमारे १०० शाळांची निवड केलेली आहे. या उच्च प्राथमिक शाळांमध्ये उर्दू हा विषय हिंदी या विषयासोबत संयुक्तपणे शिकण्याची सोय केली आहे. मात्र त्या शाळांमधील शिक्षकांच्या मानधनाची जबाबदारी संबंधित शाळेवरच ढकलली आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक देत त्यांच्या वेतनाची तरतूद करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेतर्फे केलेली आहे.

शासनाने निवडलेल्या शाळांमध्ये उर्दू विषयाच्या अध्यापनासाठी परिसरातील उर्दू शिक्षकांची मदत घेण्याचे शासन आदेशात म्हटले आहे. शिवाय याबाबत कोणतेही अनुदान न देता शासन स्वत:ची जबाबदारी झटकून ती संबंधित शाळा व्यवस्थापनांवर टाकत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. तरी शासनानेया निर्णयाचा फेरविचार करून वेतन अनुदान द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.