शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

By admin | Updated: June 24, 2017 04:06 IST

महाराष्ट्र मोटार व्हेईकल (रेग्युलेशन्स आॅफ स्कूल बसेस) रुल्स, २०११ नुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खासगी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र मोटार व्हेईकल (रेग्युलेशन्स आॅफ स्कूल बसेस) रुल्स, २०११ नुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बस आॅपरेटर्सनी शाळांबरोबर कॉमन स्टँडर्ड अ‍ॅग्रिमेंट (सीएसए) करणे बंधनकारक आहे. या करारामुळे शाळा पालकांच्या वतीने बस आॅपरेटर्स विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदारी घेतात का, हे पाहण्याची जबाबदारी घेते. मात्र राज्यात ३३१० स्कूल व्हॅन या कराराशिवायच विद्यार्थ्यांची ने-आण करून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करत आहेत.खासगी बस आॅपरेटर्स, स्कूल व्हॅन, एमएसआरटीसी, बेस्ट नियमांचे पालन न करताच शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करत असूनही सरकार त्यांना परवाना देत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करत असल्याने सरकारलाच नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती पीटीए या एनजीओने उच्च न्यायालयात केली आहे. पीटीएने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्रानुसार, राज्यात एकूण ११,९२२ स्कूल बस असून त्यापैकी ८५९१ स्कूल बसने शाळांबरोबर करार केलेला नाही. ‘पालकांनीच जर एखादी स्कूल बस किंवा व्हॅन मुलांना शाळेत सोडण्यासाठी नेमली असेल तर त्या बस आॅपरेटरला किंवा व्हॅन मालकाला शाळेबरोबर करार करण्याची आवश्यकता नाही,’ असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकील रमा सुब्रमण्यम यांनी आक्षेप घेतला. ‘नियमांचे पालन करणाऱ्यालाच शाळेची बस किंवा व्हॅन चालवण्याचा परवाना देण्यात येतो. मात्र सरकार नियमांचे पालन न करणाऱ्यांनाही परवाना देत आहे. कराराची आवश्यकता नाही, असे सांगून सरकार बेकायदा व्हॅनना प्रोत्साहन देत आहे आणि मुलांच्या सुरक्षेशी तडजोड करत आहे.करारानुसार (सीएसए) शाळांना स्कूल बस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करते की नाही, हे पाहणे बंधनकारक आहे. मात्र सरकारच्या भूमिकेमुळे स्कूल बस व व्हॅन बेलगाम होतील,’ असा युक्तिवाद रमा यांनी न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकिलांनी यासंदर्भात महाराष्ट्र मोटार व्हेईकल (रेग्युलेशन्स आॅफ स्कूल बसेस) रुल्स, २०११ मध्ये परिवहन विभागाने सुधारणा केली असून अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवल्याचे सांगितले.प्रतिज्ञापत्रानुसार, प्रस्तावित सुधारित नियमांनुसार, पालकांनी नेमलेल्या स्कूल बस किंवा व्हॅनसाठी शाळेबरोबर करार करणे बंधनकारक नाही. यावरील पुढील सुनावणी ६ जुलैला होणार आहे़