शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट शुल्क वसुली वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:11 IST

प्लॅस्टिक वापरणा-या दुकानदारांकडून ‘वेस्ट मॅनेजमेंट’पोटी शुल्क वसुली करावी, या केंद्राच्या आदेशाला हरताळ फासल्याने

गणेश देशमुख मुंबई : प्लॅस्टिक वापरणा-या दुकानदारांकडून ‘वेस्ट मॅनेजमेंट’पोटी शुल्क वसुली करावी, या केंद्राच्या आदेशाला हरताळ फासल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुमारे एक हजार कोटींचा महसूल बुडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासनाने २३ मार्च २०१८ रोजी संपूर्ण प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी १८ मार्च २०१६ रोजी केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि वातावरण बदल खात्याने अधिसूचना लागू केली. त्यानुसार प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांकडून ‘वेस्ट मॅनेजमेंट फी’ वसूल करण्याचे बंधन घातले होते; तथापि महाराष्ट्रातील एकाही नगरपालिका वा महापालिकेच्या हद्दीत अधिकाºयांनी ही वसुली केलेली नाही.काय म्हणतो नियम?कुठल्याही दुकानदाराला वा फेरीवाल्याला त्याच्या ग्राहकांना प्लॅस्टिकची पिशवी द्यायची असल्यास त्याने त्याची नोंदणी नगरपालिका किंवा महानगरपालिकेत करावी. त्या नोंदणीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था ‘प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट’साठीचे वार्षिक ४८,००० रुपये शुल्क त्या दुकानदाराकडून वा फेरीवाल्याकडून वसूल करेल. दुकानदारांच्या पिशव्यांची मागणी जास्त असल्यास शुल्क वाढविण्याचे अधिकार संबंधित अधिकाºयांना प्रदान करण्यात आले होते. अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांत हीनोंदणी व शुल्क वसूल करणे बंधनकारक होते. राज्यात १६७ नगरपालिका आणि २७ महापालिका आहेत. ‘क’ वर्गाच्या अमरावती महापालिका क्षेत्रात ३५,००० नोंदणीकृत फेरीवाले आहेत. प्रत्येक महापालिका क्षेत्रात सरासरी २५,००० फेरीवाले आणि २००० दुकानदार, १६४ नगरपालिकांमध्ये सरासरी २००० फेरीवाले व दुकानदार गृहित धरल्यास ‘प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट’पोटी वर्षाकाठी ५०७ कोटी रुपये शुल्क वसुल करता आले असते. दोन वर्षांत १०१४ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकले असते. प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देणारे सरकार याबाबत कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष आहे.