शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वारी मध्ये होणार प्लास्टिक मुक्तीचा जनजागर

By admin | Updated: June 27, 2016 19:52 IST

जगाला भक्तीचा आदर्श घालून देणारा संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा अनोखा ठरणार आहे. पालखी मध्ये सहभागी होणा-या सुमारे

पुणे : जगाला भक्तीचा आदर्श घालून देणारा संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा अनोखा ठरणार आहे. पालखी मध्ये सहभागी होणा-या सुमारे 15 ते 20 दिंडयांनी संपूर्ण दिंडी मध्ये प्लास्टिक न वापरण्याचे आश्वासन दिले आहे. या शिवाय वारी दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची विक्री होऊ नये यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे दक्षता पथक, तसेच प्लास्टिक बंदीवर नियंत्रण ठेवणारे एक स्वतंत्र पथकही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. या शिवाय या वर्षीच्या वारी मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार प्लास्टिक न वापरण्याबाबत हे पथक जनजगृती करणार आहे.हे दोन्ही पालखी सोहळे बुधवारी (दि.29) रोजी दोन दिवसांच्या पुणे मुक्कामी येत आहेत. या कालावधीत लाखो भाविक पुण्यात मुक्कामी असतात, वारीसाठी आवश्यक असलेले दैनंदीन साहित्य हे वारकरी पुण्यातील बाजारपेठांमधून खरेदी करून सोबत घेऊन जातात. या शिवाय या कालावधीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह वारक-यांना फळे तसेच अल्पोपहाराचे वाटप करणारे भाविकांची संख्याही अधिक असते. हे भाविक प्लास्टिक पिशव्यांमधून हे खाद्यपदार्थ वाटप करतात. त्यामुळे वारी शहरातून पुढे गेल्यानंतर प्लास्टिकच्या कच-याचे मोठे ढीग साचलेले असतात. तसेच हे प्लास्टिक मोठया प्रमाणात नाले तसेच चेंबर मध्ये टाकले गेल्याने शहरात नंतर पाऊस होताच अनेक ठिकाणी नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षापासून महापालिकेकडून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन दिंडी प्रमुख तसेच वारी मधील वारक-यांना केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे 15 ते 20 दिंडी प्रमुखांनी संपूर्ण वारीत कोठेही प्लास्टिक न वापरण्याचा निर्णय घेतला असून नुकत्याच जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या वारी नियोजनाच्या बैठकीत तो महापालिकेस कळविला आहे. त्यामुळे या दिंडयांचा महापालिकेकडून विशेष सत्कारही करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या शिवाय प्लास्टिक विक्रेत्यांवर तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वारी मध्ये विक्री करणा-या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पालिकेची उपद्रव दक्षता पथकासह प्लास्टिक निर्मूलन पथकही दोन दिवस तैनात करण्यात येणार आहे.