शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना हवीय सिनेगीतांवर लावणी !

By admin | Updated: September 8, 2016 23:46 IST

तरुणांची बदलती अभिरुची यामुळे पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली असून, तरुणांना सिनेगीतांवर लावणी हवीय.

ऑनलाइन लोकमत

जालना, दि. 8 - लावणी ही महाराष्ट्राची लोककला. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेले बदल आणि तरुणांची बदलती अभिरुची यामुळे पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली असून, तरुणांना सिनेगीतांवर लावणी हवीय. बदलत्या पिढीनुसार आम्हालाही बदलावे लागेल, असे मत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. जालना गणेश फेस्टिवलमध्ये नऊ दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या फेस्टिवलमध्ये बुधवारी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरचा नटरंगी नार हा लावणीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी स्टेडियम अक्षरश: फुल्ल झाले होते.याप्रसंगी सुरेखा पुणेकर म्हणाल्या, पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली आहे. पिढी दर पिढीचे विचार बदलतात. तसेच त्यांची जीवनशैली व आवडनिवडही बदलते. त्यामुळे कलेच्या क्षेत्रात बदलत्या काळानुसार बदल करणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा कालौघात कला आणि कलाकार दोघेही नामशेष होण्याचीच भिती अधिक असते. मध्यंतरी लावणी या कलेला चांगले दिवस आले होते. मात्र, सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे रसिकांची अभिरुचीदेखील बदलत आहे. पारंपरिक लावणीऐवजी आता तरुणांसह महिलांनाही सिनेगितांवरील लावणी पहायला अधिक आवडत आहे. जालन्यातील रसिक अधिक सुजान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे आहेत. कुठल्याही कलाकाराला त्याच्या कलेसाठी दिलेली दाद ही अद्वितीय असते. कलाकाराची तिच संपत्ती असते. कलाकराने किती पैसे कमावले, यापेक्षा रसिक किती समाधानी झाले हीच त्याची पावती असते, असे पुणेकर म्हणाल्या. पूर्वी जालन्यात आल्यानंतर जागेअभावी गर्दी आणि दर्दी कमी असायचे. यंदा मात्र भव्य अशा स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियमवर हा फेस्टिवल ठेवल्याने बुधवारी झालेल्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पुणेकर यांनी आवर्जून सांगितले.