शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूमध्ये वृक्षारोपणाची सज्जता

By admin | Updated: July 1, 2016 03:57 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीनुसार संतांनी मानवाचे वृक्षांशी नाते जोडले आहे .

डहाणू/बोडी: ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीनुसार संतांनी मानवाचे वृक्षांशी नाते जोडले आहे . त्याच अनुषंगाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने १ जुलै रोजी वन महोत्सवाचे आयोजन करून शासनाने दोन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान हरित महाराष्ट्रचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डहाणूतील प्रशासन सज्ज झाले असून सर्वच स्तरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. हा महत्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी राबविण्यात येणार आहे.वन विभागाने वन महोत्सव आणि कृषिदिनाचे औचित्य साधून एकाच दिवशी दोन कोटी झाडे राज्यभरात लावण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमात जवळपास वीस विभागांचा समावेश करण्यात आला असून कोणत्या विभागाने किती झाडे लावावीत याचे सर्वसाधारण लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. डहाणू उप वन संरक्षक लडकत यांच्या अखत्यारीत डहाणू विभागात ३,३५,५५७० वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. तर, डहाणू महसूल विभाग तहसिलदार प्रीतीलता कौरथी माने पाच मंडळात १,००० रोपे लावून घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे उप अभियंता पी. खैरनार यांनी सांगितले. गट विकास अधिकारी रमेश अवचार यांच्या देखरेखीखाली डहाणू पंचायत समितीच्या विविध विभागातून ५१,००० रोपे लावण्यात येणार आहेत. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४७० आणि २६ शाळांमध्ये प्रत्येकी २० रोपे तर नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६५ उप केंद्रात साधारणत: २० रोपे लावणार आहेत, असे पोलीस अधिकारी पांडकर यांनी सांगितले. (वार्ताहर)सर्वसामान्य जनता, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालये आणि लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे खाजगी, पडीक, सामूहिक, वनेतर तसेच रस्त्याच्या दुतर्फा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या काळात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. केवळ ही रोपे लावायची नसून, ती जगवायची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर असणार आहे.