शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नियोजन

By admin | Updated: October 17, 2016 04:20 IST

व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाचे परिणामकारक नियोजन करण्यात आले.

जितेंद्र कालेकर,

ठाणे- व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाचे परिणामकारक नियोजन करण्यात आले. तसेच मोर्चाकरिता तयार केलेल्या आचारसंहितेचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रचारही करण्यात आला. त्यामुळेच हा सुसूत्रताबद्ध मोर्चा निघाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या ठाण्यातील स्वयंसेवकांनी लोकमतला दिली. गेल्या महिनाभरापासून या मोर्चाची तयारी केली होती. शहरातील वागळे इस्टेट, नौपाडा, लोकमान्यनगर, कोपरी आदी विभागांमध्ये दरआठवड्याला बैठका घेऊन मोर्चाची रणनीती आखली होती. मोर्चासाठी राज्यस्तरीय मार्गदर्शक तत्त्वे ठरली होती. त्याचे पालन आणि अनुकरण प्रभावीपणे करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही बनवण्यात आले होते. एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये २५६ सदस्य नोंदवण्याची मर्यादा असल्याने असे शेकडो ग्रुप कार्यरत होते. फेसबुकचाही प्रभावी वापर केल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. कुठेही कचरा फेकू नये, मोर्चात शिस्त असावी, घोषणा नको, कोणालाही त्रास देऊ नये, अशा अनेक मार्गदर्शक सूचनांची यादी या ग्रुपवरून आपल्या बांधवांना फॉरवर्ड केली जात होती. >‘स्वयंसेवक’ ग्रुपमोर्चातील बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४० जणांचा ‘स्वयंसेवक’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला होता. वरिष्ठ समितीने पोलिसांबरोबर बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन केले होते. >मोर्चासाठी सहा मुख्य मार्गमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याकरिता सहा मार्गांचे नियोजन केले होते. पहिला मार्ग- तीनहातनाका, नाईकवाडी. दुसरा- अल्मेडा रोड, ठाणे महापालिका भवन. तिसरा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, एसटी कार्यशाळा, खोपट. चौथा मार्ग- केव्हीला रोड ते सेंट्रल मैदान. पाचवा- कळवा, खारेगाव उड्डाणपूलमार्गे आणि सहावा खारटन रोड मार्ग. या सहा मार्गांची माहिती व नकाशे व्हॉट्सअ‍ॅपवरून फॉरवर्ड केले होते. ज्या मार्गाने याल त्याच मार्गाने परत जा, अशी सूचना केली होती.पाठपुरावा करणार- विचारेमराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी हा मुद्दा आपण लोकसभेत उचलून धरणार असल्याचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.