शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास

By admin | Updated: April 25, 2017 16:47 IST

सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 25 - श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, श्रीमलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे येथे होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी अडवण्यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, सुभाष भोईर, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.श्रीमलंग गडाचा समावेश राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या ब गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद तसेच वनविभागाकडे अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या. मात्र, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील वादामुळे या परिसराचा विकास रखडला होता.सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खा. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. श्रीमलंग गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसेच येथे पर्यटन विकासालाही भरपूर वाव आहे. या परिसराचा विकास होण्याबरोबरच स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा सादर करण्याची मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद आणि वनविभाग यांनी कार्यक्षेत्राचा बागुलबुवा उभा न करता या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने १० कोटींचा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, पावसाचे पाणी अडवण्यासाठीही सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.पाणीटंचाईबाबत खासदारांनी खडसावलेश्रीमलंगगड परिसरात पडणारे पावसाचे पाणी अडवण्याच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून दाखवल्या जात असलेल्या  उदासीनतेबाबतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या परिसरात भरपूर पाऊस होऊनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. गेल्या वर्षी मी स्वत: १० गावांमधले बंधारे आणि तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता लाखो लीटरने वाढली. त्याचवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या परिसरातील बंधाऱ्यांची डागडुजी, त्यांची उंची वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी नव्या बंधाऱ्यांचे बांधकाम यांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप याबाबत काहीही हालचाल झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, या परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असूनही नादुरुस्त बोअर आणि हँडपंपची दुरुस्ती केली जात नाही. येथील काही गावांमध्ये नळपाणी योजना असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे, प्रत्यक्षात जागेवर नळपाणी योजना अस्तित्वात नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.