शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युद्धापूर्वीच तहाची भाषा

By admin | Updated: April 26, 2016 03:30 IST

कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती, त्यांनी अखिल भारतीय नाही तर निदान विभागीय संमेलन तरी आम्हाला साजरे करू द्या, अशी बोटचेपी भूमिका घेतली आहे. मसापच्या वर्षानुवर्षे पदाला चिकटून बसलेल्या जिल्हा प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत साहित्यसंमेलन झालेले नाही, असा आरोप तरुण लेखक, साहित्यिक यांनी केला आहे.कल्याणचे प्रभाकर संत, ठाण्याचे पद्माकर शिरवाडकर व डोंबिवलीचे सुरेश देशपांडे हे मसापचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. संत व शिरवाडकर हे गेली सुमारे १०वर्षे जिल्हा प्रतिनिधी असून देशपांडे हे अलीकडेच जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्त झाले. संत व शिरवाडकर दोघे वयोवृद्ध आहेत. संत यांना श्रवणयंत्राखेरीज ऐकू येत नाही. ते दीर्घकाळ बैठकीला बसू शकत नाहीत. मात्र, तरीही तरुण पिढीकडे जिल्हा प्रतिनिधीपद सोपवून कल्याण-डोंबिवलीतील नव्या दमाच्या लेखक, कवी यांना संधी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली नाही. मसापची निवडणूक टाळण्याकडे व स्वत:ची वर्णी लावून घेण्याकडे या मंडळींचा कल असल्याचे तरुण साहित्यिकांचे मत आहे.कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे. तिला साहित्य संस्कृतीचा वारसा आहे. याठिकाणी अनेक साहित्यिक राहत होते व आहेत. मात्र, तरीही कल्याणमध्ये साहित्यसंमेलन झालेले नाही. कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोेशी यांनी आता संमेलनाची मागणी केली आहे.