शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

अल्पसंख्याकांसाठी आराखडा आखा

By admin | Updated: August 1, 2016 04:43 IST

अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनाही व्हावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याची सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली

मुंबई : राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनाही व्हावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याची सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली आहे. अल्पसंख्याकांसाठी दरवर्षी किमान एक प्रकल्प सुरू करण्यात यावा, असा शासन निर्णयाद्वारे देण्यात आला आहे.अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासंदर्भात अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. यात अल्पसंख्यात समाजातील युवांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत चर्चा झाली. विविध विभागांकडून दिल्या जाणाऱ्या सोई सवलती आणि योजनांची माहिती अल्पसंख्य समाजापर्यंत पोहचावी यासाठी सूचना देण्यात आल्या. या बैठकीच्या अनुषंगाने अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार, अल्पसंख्यांक समाजापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी शक्य असेल तेथे आपल्या मंजूर निधीमधील १५ टक्के निधी अल्पसंख्यांकासाठीच्या योजनांसाठी राखून ठेवावा. तसेच दरवर्षी अल्पसंख्यांकांसाठी किमान एक प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधण्याची जबाबदारी अल्पसंख्याक विकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांच तिमाही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याच्या सूचनाही विभागाला देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक समाजातील युवांपर्यंत विकास पोहचवून त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागासह शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, नगर विकास, कौशल्य विकास, महिला व बाल कल्याण विकास, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागासाठी मार्गदर्शक सूचनाही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक विद्याथ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी अल्पसंख्याक बहुल ४ जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट ेराबविण्यापासून शासकीय सेवेतील अल्पसंख्याक समाजाचा टक्का वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.>कामांची माहिती द्या!अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. यात सच्चर समिती, कुंडू समिती, मेहमुद्दूर समिती, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आदी संशोधन प्रकल्प आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.