मालेगाव :- तालुक्यातील ८३ ग्रा.पं.मधील शौचालय बांधकामाचे २२५५० उदिदष्ट बाकी आहे. मार्च २०१८ पर्यत संपुर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प गणेश पाटील यांनी केला आहे. या पाशर्भुमीवर प्रत्येक पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची आढावा बैठक पाटील यांनी घेतली आहे.२०१६- १७ च्या वार्षिक कृती आराखडयामध्ये मालेगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवड केली आहे. या ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे बांधकाम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात येत आहे.उर्वरित ६५ ग्रा.पं.मधील शौचालयाचे बांधकाम महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधुन करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम करणा-या ग्रामपंचायती डिसेबंर अखेर पर्यंत हागणदारी मुक्त करावयाचे आदेश गणेश पाटिल यांनी दिले आहेत. यावेळी ते म्हणाले कि, महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये काम करणा-या ग्रा.प.च्या ग्रामसेवकांनी दर महिन्याला किमान १० ते १५ शौचालयाचे बांधकाम करावे .या कामात कुचराई करणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येईल ! या आढावा बौठकीत स्वच्छ भारत मिशन मध्ये कामात कुचराई करणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली
मार्च २०१८ पर्यंत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प!
By admin | Updated: July 21, 2016 16:10 IST