शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीयूष बोंगिरवार ‘साहेबां’चे सहाव्या माळ्यावरील कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:40 IST

विशेष प्रतिनिधीमुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेकायदा बांधकाम करणाºया ‘वोक एक्स्प्रेस’ हे रेस्टॉरंट चालविणाºया कंपनीचे पीयूष बोंगीरवार साहेब हे एक संचालक आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. या रेस्टॉरंटच्या मालकांचे सहाव्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कोणत्या अधिकाºयाशी नाते आहे, असा सवाल विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत केला.प्रश्नोत्तराच्या तासात ...

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेकायदा बांधकाम करणाºया ‘वोक एक्स्प्रेस’ हे रेस्टॉरंट चालविणाºया कंपनीचे पीयूष बोंगीरवार साहेब हे एक संचालक आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. या रेस्टॉरंटच्या मालकांचे सहाव्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कोणत्या अधिकाºयाशी नाते आहे, असा सवाल विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत केला.प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावरील चर्चा चांगलीच रंगली. भाजपाचे सरदार तारासिंह यांनीया हे रेस्टॉरन्ट चालविणाºया‘स्पाईस अँड ग्रेन्स’ या परदेशी कंपनीने तेथे केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, लेखी उत्तराने आपले समाधान झाले असल्याचे तारासिंग म्हणाले. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुढील प्रश्नही पुकारला पण काँग्रेसचे सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारणेसुरू केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्या मदतीला धावले. या रेस्टॉरन्टच्या कंपनीचे संचालक हे सहाव्या माळ्यावर कोणाचे नातेवाइक आहेत, असा सवाल त्यांनी केला. पीयूष बोंगिरवार ‘साहेब’ हे संचालक असल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हणताच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बसूनच साहेब या शब्दावर आक्षेप घेतल्यावर पाटील यांनी, पीयूष बोंगिरवार संचालक आहेत, अशी सुधारणा केली. त्याचवेळी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आपल्याला अधिकबोलता येणार नाही, असे सांगत पाटील यांनी स्वत:ची सुटका करवून घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ठ होते हे विभागाला माहिती होते तर मग सभागृहात का आणले, असे खडे बोल अध्यक्षांनी त्यांना सुनावले.हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास आपण स्थगिती दिलेली नव्हती. या रेस्टॉरन्टने फुडकोर्ट इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यामध्ये केलेले काचेच्या भिंतीचे बांधकाम त्यांनी स्वत: हटविले आहे. परंतु गाळ्यासमोरील व्हरांड्याचा वापर ते रेस्टॉरन्टच्या बैठक व्यवस्थेसाठी करीत असून ते काढण्याबद्दल एमएमआरडीएमार्फत कारवाई सुरू आहे, असे राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही चांगले मंत्री आहात, कुणासाठी तुमचा अभिमन्यू होऊ नये एवढेच, असा चिमटा विरोधकांनी पाटील यांना काढला. कर्मकृत्य कोणाचे असते आणि बदनाम मात्र राजकारणी होतात, असा टोला राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मारला.