शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:02 IST

भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही.

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही. २००६ मध्ये सुरू झालेला हा उड्डाणपूल सुरुवातीपासून कमकुवत असून मागील तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी हा उड्डाणपूल बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले. परंतु, अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसताना या उड्डाणपुलाच्या प्रारंभी पडलेले खड्डे हे वाहनांसाठी जीवघेणे ठरत आहेत. 

उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे हे बरोबर चारचाकी हलक्या वाहनांच्या चाकाखाली येत असल्याने त्यांना या ठिकाणाहून वाहन चालवणे मोठ्या जिकरीचे ठरत आहे. त्यातच मागील तीन ते चार दिवस पडलेल्या पावसात या रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अशा परिस्थितीत या उड्डाणपुलाकडे व येथुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे भिवंडी पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करीत असून, येथे तात्पुरती डागडुजी करण्यासाठी ही प्रयत्न करीत नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे