शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

झिंगाट पावसात कणसाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:32 IST

दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला

पुणे : दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला. पुण्यातील एकजात सगळ्या पुलांवर नदीचे वाहते पाणी पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले तसे मुठेचे पाणीही वाढले. त्यामुळे दुपारनंतर गर्दीत प्रचंड वाढ झाली. भाजलेल्या कणसांनी या गर्दीच्या आनंदात आणखी भर टाकली.गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी मात्र सकाळीच हजेरी लावली. सुरुवातीला तो हळुवार बरसत होता, नंतर मात्र त्याने जोर धरला. संततधारच सुरू झाली. धरणक्षेत्रातही असाच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुठेचे पाणी वाढू लागले. राजाराम पूलापासून मुठा नदीवरच्या प्रत्येक पुलावर व कॉजवेवर आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली. झेड ब्रिज युवकांचा अत्यंत आवडता पूल, मात्र पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावला होता. नदीपात्रातून जाणारा भिडे पूल तर गुरुवारीच बंद करण्यात आला होता. तरीही या दोन्ही पुलांवर पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वाहन पुलाच्या कडेला ठेवून तिथे सगळे पायीच जात होते. गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पूल, बालगंधर्वजवळचा वि. रा. शिंदे पूल, शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती संभाजी पूल गर्दीने फुलून गेले. तरुणाईने जणू पाऊस अंगात भरून घेतला. वाहने पुलाच्या कडेला लावून गर्दीने सगळे जण वाहत्या पाण्याची गंमत अनुभवत होते. त्यांच्या जोडीने काही वयोवृद्ध पुणेकरही गर्दी करीत होते. त्यांच्यातील काहींनी पानशेतच्या पुराच्या आठवणी जागवल्या. त्या वेळी पाणी कुठपर्यंत होते, कधी आले, किती दिवस होते असे अनेक प्रश्न त्यांना तरुणांनी विचारले. काही मुलींनी दप्तरातील वह्यांचे कागद फाडून त्याच्या नावा तयार केल्या व पुलावरून नदीत सोडल्या. पाण्याच्या लोटात त्यांना शोधण्याचा खेळच मग जल्लोष करीत सुरू झाला.(प्रतिनिधी) >कचऱ्याबाबत जागृतीकाही अस्सल पुणेकरांनी नदीच्या पाण्यात वाहून येत असलेल्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची संख्या त्यात जास्त होती. नदीपात्राच्या कडेला या पिशव्या अडकून राहत होत्या. बंद करा या पिशव्या वापरणे, असे आवाहनही काही पुणेकरांनी जमलेल्या गर्दीला करण्यास सुरुवात केली.गर्दीही वाढलीचहा, गरम भजी, कोळशाच्या भट्टीत भाजलेली मक्याची गरमागरम कणसे यांच्या विक्रेत्यांनी या गर्दीच्या आनंदात भर टाकली. कणीस कुठे मिळते, अशी विचारणा करीत पुलाच्या कडेला थांबलेल्या विक्रेत्यांच्या गाड्यांवर झुंबड उडत होती. अनेक पालक बरोबरच्या मुलांना खांद्यावर घेऊन पाणी दाखवत होते. दुपारी ४ नंतर नदीचे पाणी वाढले व मग तर या गर्दीला बहरच आला. जत्रा असावी तसे नागरिक पुलावर येत होते व पावसाचा, वाहत्या पाण्याचा आनंद अनुभवत होते.