शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’मध्ये पिंपरी अव्वल

By admin | Updated: June 28, 2016 01:47 IST

महावितरणच्या पिंपरी विभागात ९६ हजार ८४२ ग्राहकांनी १६ कोटी ५२ लाख रुपयांचा ‘आॅनलाइन’ भरणा केलेला आहे.

पिंपरी : महावितरणच्या पिंपरी विभागात ९६ हजार ८४२ ग्राहकांनी १६ कोटी ५२ लाख रुपयांचा ‘आॅनलाइन’ भरणा केलेला आहे. पुणे परिमंडळातील मे महिन्यातील हा सर्वाधिक वीज (देयके) बिलभरणा आहे. गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी विभाग आॅनलाइन वीजबिल आॅनलाइन भरण्यात आघाडीवर आहे. शहरासाठी ही भूषणावह बाब आहे. पिंपरी विभागात एकूण ३ लाख ३८ हजार वीजग्राहक आहेत. हिंजवडी, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, प्राधिकरण, चिंचवड, निगडी आदी भागांत सर्वाधिक सुरक्षित ग्राहक आहेत. महावितरणने संकेतस्थळासह मोबाइलधारकांसाठी अ‍ॅपद्वारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भात वीज बिलावर माहिती दिली आहे. तसेच, जनजागृती केली जात आहे. वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. वीज बिल भरणा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी रांगेत उभे राहून बिल भरण्यापेक्षा आॅनलाइन काही सेकंदांत बिल भरण्यास पसंती दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रवास व रांगेत उभे राहणे, सुट्या पैशांचा प्रश्नाच्या कटकटीपासून सुटका झाली आहे. व्यस्त जीवनपद्धती आणि नवरा-बायको दोघे नोकरी करीत असल्याने कोणाकडे फावला वेळ नसतो. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातूनच मोबाइलद्वारे बिल भरून मोकळे होतात. त्यामुळे वेळ वाचतो. बिल मुदतीत न भरल्याने वीज कट होण्याचा ताप वाचतो. महावितरणने इंटरनेटद्वारे ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ‘आॅनलाइन’ बिल भरण्याची सुविधा लघुुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सोबतच महावितरणने आॅगस्ट २०१५ मध्ये स्मार्ट मोबाइलधारकांसाठी अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडिट वा डेबिट कार्ड वा नेटबॅँकिंगद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत ताटकळण्याऐवजी महावितरणच्या वेबसाइट व अ‍ॅपवरून बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाइन बिल भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तसेच छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट किंवा नेटबॅँकिंगचा पर्याय उपलब्ध असून, वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह बिल आॅनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या बिलाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.(प्रतिनिधी)>ग्राहकांना एसएसएमद्वारे संदेशगेल्या वर्षीपासून पिंपरी विभागात आॅनलाइन वीज बिलभरणा सर्वाधिक होत आहे. बिल भरले नसल्यास ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएस पाठविला जातो. त्यामुळे ग्राहक जागृत होऊन त्वरित आॅनलाइन भरणा करून मोकळा होतो. तसेच, आॅनलाइन बिल भरण्यासंदर्भात परिसरात जनजागृती केली जात आहे. या परिसरात सर्वाधिक सुरक्षित भाग आहे. तसेच, आयटी पार्कचे अभियंते मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यामुळे आॅनलाइन बिल भरण्यास पसंती दिली जात आहे, असे पिंपरी विभागाने सांगितले. >भोसरी विभागातून १२ कोटी ४० लाखांचा भरणापुणे परिमंडलात आॅनलाइन भरणा १०९ कोटी रुपयांवर गेला आहे. एकूण पाच लाख ग्राहक गेल्या पाच वर्षांत वीजदेयकांच्या आॅनलाइन भरण्यात प्रथमच १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गणेशखिंड मंडलातील पिंपरीतील एकूण ९६ हजार ८४२ ग्राहकांनी आॅनलाइन वीज बिल भरले. याद्वारे सर्वाधिक १६ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले. भोसरी विभागात ४८ हजार १७१ ग्राहकांनी १२ कोटी ४० लाख रुपये भरणा झाला आहे. गणेशखिंड मंडलमधील आॅनलाइन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या मे महिन्यात २ लाख ५५ हजारांवर गेली असून, त्यांनी ५५ कोटी ५० लाखांचा बिलभरणा केला आहे. शिवाजीनगर विभागात ५४ हजार ३२० ग्राहकांनी १४ कोटी ८४ लाख रुपये व कोथरूड विभागात ५५ हजार ६०५ वीजग्राहकांनी ११ कोटी ७४ लाख रुपयांच्या देयकांचा आॅनलाइन भरणा केला आहे.