शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समायोजनेच्या विरोधात जनहित याचिका

By admin | Updated: September 10, 2016 04:56 IST

शिक्षकांचा समायोजनाचा वाद चिघळला असून शासनाच्या या जाचक अटींच्या विरोधात शिक्षक संघटनांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत

ठाणे : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा समायोजनाचा वाद चिघळला असून शासनाच्या या जाचक अटींच्या विरोधात शिक्षक संघटनांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने नरसू पाटील यांनी शासनाच्या २८ आॅगस्ट २०१५ रोजीच्या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाची जुनीच निकष पद्धती लागू करण्याची मागणी या जनहित याचिकेच्या माध्यमातून केली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न या याचिकेच्या माध्यमातून मांडला आहे. राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा सध्या गंभीर झाला आहे. राज्यातील सर्वच शिक्षक संघटना याविरोधात आहेत. राज्य शासनही आपल्या भूमीकेवर ठाम असल्याने हा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन करण्यासाठी शिक्षण विभागानेही हालचालींना सुरु वात केल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये नाराजी आहे. विशेष करून कोकणात आणि मुंबई विभागात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असून शाळांना या दरम्यान सुटी असते. या सुट्टीतच शिक्षण विभागाने अतिरिक्त समायोजन शिबिराचे आयोजन केल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती. शिक्षकांची ही नाराजी लक्षात घेऊन समायोजनेची प्रक्रि या लांबविली असली तरी ती रद्द केलेली नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करूनही समायोजनेचा तिढा न सुटल्याने अखेर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ) च्या वतीने पाटील यांनी उच्च न्यालयालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)>शिक्षकांमध्ये संभ्रमठाणे जिल्ह्यात २००, रायगडमध्ये २४२, सिंधुदुर्गमध्ये ११४, तर रत्नागिरीमध्ये ८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांसाठी त्याच जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे, ही माहितीही शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर केली जात नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात समायोजन करता आले नाही तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात समायोजन करण्याचा सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे नरसू पाटील यांनी म्हटले आहे.३० वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेला शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात कसा काम करून शकेल, म्हणून या प्रक्रि येला स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल केल्याची माहिती पाटील यांनी दिली.