शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलविरुद्ध जनहित याचिका

By admin | Updated: April 6, 2016 05:10 IST

राज्यात दुष्काळ असतानाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेपूर्वी मैदानावरील खेळपट्टीची देखभाल करण्याकरिता लाखो लीटर पाणी वापरण्यात येईल, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आली आहे.

मुंबई : राज्यात दुष्काळ असतानाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेपूर्वी मैदानावरील खेळपट्टीची देखभाल करण्याकरिता लाखो लीटर पाणी वापरण्यात येईल, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. आयपीएलचे सामने खेळविण्यात येणाऱ्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मैदानांवरील खेळपट्यांच्या देखभालीसाठी ६० लाख लीटर पाणी वापरण्यात येईल. एकीकडे पाण्याअभावी मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशी मागणी ‘लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. महाराष्ट्र जल धोरणामध्ये पाणीवाटसाठी प्राधान्य ठरवून दिले आहे. अशा कामाकरिता पाणी वापरण्यासाठी सगळ्यात शेवटी महत्त्व देण्यात आले आहे. त्यावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सामन्यांची तिकिटे आधीच विकल्याचे खंडपीठाला सांगितले. या याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करताना उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, राज्य सरकार आणि मुंबई, नागपूर महापालिकेला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, केतन तिरोडकर यांनीही उच्च न्यायालयात आयपीएलमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीवापराविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)