शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

चित्रांनी सजली येरवडा कारागृहाची संरक्षक भिंत

By admin | Updated: April 3, 2017 01:02 IST

तुरुंगाची भिंत म्हणजे रुक्ष, कोरडी ठणठणीत, कठोर, भावहीन दिसणारी

पुणे : तुरुंगाची भिंत म्हणजे रुक्ष, कोरडी ठणठणीत, कठोर, भावहीन दिसणारी. आतील बाजूने ती अशी असेल कदाचित; पण तिचे बाह्यरूप मात्र काही चित्रकारांनी आता असे आकर्षक केले आहे की, ही भिंत न बोलताही जाणाऱ्या-येणाऱ्यांशी रंगसंवाद करू लागली आहे. त्यांना आनंद देऊ लागली आहे.सुमारे ३०० मीटर लांबीची व तब्बल ७ मीटर उंचीची म्हणजे, २२ हजार ६०० चौरस फूट अशी प्रचंड लांबी-रुंदी असलेली ही भिंत म्हणजे अन्य सर्व भिंतींसारखीच खडबडीत अशी होती. कारागृहाची भिंत असल्यामुळे तिच्या खडबडीतपणात वाढच झाली होती. रस्त्याने वाहनावरून किंवा पायीही जाताना ती संपता संपत नसे. या रस्त्याने विमानतळावरून येणारे-जाणारे अनेकजण प्रवास करीत असतात. पुण्यात प्रवेश करताक्षणीच त्यांचे स्वागत या कोरड्या, रुक्ष भिंतीने होत असे.ही बाब जाणवल्यामुळेच रंगकामांसाठी म्हणून खास या भिंतीची निवड करण्यात आली. हर्षवर्धन कदम या चित्रकाराने अवघ्या काही महिन्यांमध्येच आपल्या अन्य काही युवा चित्रकारांच्या साह्याने या भिंतीचे स्वरूप बदलले आहे. त्यावर आकर्षक रंगांची उधळण करण्यात आली आहे. एकचएक चित्र न काढता कधी उसळत्या लाटा, तर कधी रस्त्याने सायकल चालवत जाणारी एखादी ललना, कुठे खेळणारी लहान मुले अशी सर्वसमावेशक चित्रे या भिंतीवर चितारण्यात आली आहे. त्यामुळे आता या रुक्ष भिंतींचे स्वरूपच बदलून गेले आहे.गेल्या काही महिन्यात कंपन्यांच्या मागे आर्थिक वर्ष अखेरीमुळे ताळेबंद तयार करण्याचे काम लागले होते. त्यामुळे अचानक या उपक्रमाचे अर्थसाह्य बंद झाले. महापालिका आयुक्त हे अर्थसाह्य पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. हेरिटेज विभागाने तर शहरातील अशा भिंतींची यादीच तयार केली असून, त्यावर कोणती चित्रे काढायची याचेही नियोजन केले आहे. (प्रतिनिधी) महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कल्पनेतून शहरात हा ‘स्पिकिंग वॉल’ उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत ही भिंत रंगवण्यात आली. शहरातील बालभारती; तसेच अन्य काही संस्थांच्या भिंतीही अशाच आकर्षक रंगात रंगविण्यात आल्या आहेत. बिनाले फाउंडेशन ही संस्था या उपक्रमात समन्वयाचे काम करीत आहे, तर सीएसआरच्या (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून काही कंपन्यांनी खर्चाची जबाबदारी उचलली आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलचे प्रमुख अभियंता श्याम ढवळे या उपक्रमाचे संयोजन करत आहेत.