शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट

By admin | Updated: June 30, 2016 12:34 IST

अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे

ऑनलाइन लोकमत

शहानूर संकुलअकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे.शहानूर येथे जाण्याकरिता आकोट येथून एस.टी.महामंडळाची सकाळी ७.३० ला तर परत येण्याकरीता सांयकाळी ५.३० ची बस आहे. तसेच खासगी वाहने जाता येते.आकोट येथुन पोपटखेड धरण पाहल्यानंतर शहानूर या रस्त्यामध्ये छोटे-छोटे नदीनाले लागतात. नरनाळा अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. शहानूर निसर्ग संकुल येथे वनविभागाने खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली आहे. पंरतु बुंकीग सुरू असली तर मिळेल. त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत असणे आवश्यक आहे. शिवाय जंगल फिरण्याकरीता वनविभागाची सफारी उपलब्ध असल्यास मिळु शकते. गाईड सुध्दा मिळतात. लहान मुलांना खेळण्याकरीता साहीत्य आहे. तसेच वन्यप्राणी,वनविभागाची माहीतीसह आदीवाशी बांधवाच्या संस्कृतीचा ठेवा या संकुलात पाहावयास मिळतो.शहानूर पासुन उंचावर नरनाळा किल्ला आहे. या किल्लावर जाण्याकरीता वनविभागाचे अटी व शर्ती लागु करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनाने गेल्यास एकाच दिवशी शहानूर पर्यटन केंद्र व सुरई धबधबाचा आनंद लुटता येतो.सुरई धबधबा अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यानजीक सातपुडा जंगलातील धारगड मार्गावर सुरई धबधबा हा पर्यटकाकरीता पर्वणी आहे. मात्र सुरई धबधबा येथे जाण्याकरिता एस.टी.महामंडळाची बस सेवा नाही.आकोट येथून २२ किलोमीटर अंंतरावर धारगड मार्गावर हा धबधबा आहे. या ठिकाणी जाण्याकरीता खासगी वाहनाने जावे लागते. २०० फुट उंचावरुन पाणी पडत असल्याने धबधबा पासुन रस्त्यापर्यंत नदी वाहते. धबधब्याचे पाणी कोसळत असलेल्या ठिकाणी खोलगट भाग आहे. हा भाग धोकादायक आहे. त्यामुळे केवळ धबधबा पाहण्याचा व नंतर नदीमध्ये आनंद घेता येईल. नदीमधुन धबधबापर्यंत जावे लागते.दूचाकी वाहनाने जाण्याची मजा वेगळीच आहे.पोपटखेडचे गेट पार केल्यानंतर रस्त्यामध्ये अनेक नदीनाले लागतात. सर्वत्र निसर्ग वातावरण आहे.मेळघाट अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. खाण्यापिण्याची व राहण्याची सोय नाही.त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत न्यावे. आदिवासीबहुल तसेच जंगलाचा भाग असल्याने सायंकाळपर्यंत परिसरातून बाहेर यावे लागते. सुरई धबधबा समोर धारगड येथे महादेवाचे प्राचीन शिवलिंग आहे. मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे येथे जाण्यास प्रतिबंध केला आहे.श्रावण (आॅगस्ट) महिन्यात कावडधारी जलाभिषेक करण्यासाठी प्रवेश दिला जातो.

 

 

आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

( पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

 

 

  •  

 

  •