शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे

By admin | Updated: March 11, 2016 04:11 IST

साथीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची पुरेशी समज सुशिक्षित स्त्रीला असते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिलेले खटले बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहीत

मुंबई : साथीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची पुरेशी समज सुशिक्षित स्त्रीला असते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिलेले खटले बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहीत, असे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने एका २५ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.सोलापूरच्या २५ वर्षीय तरुणाने तो एका मुंबईतील २४ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. मात्र, दोघांमधील नाते संपुष्टात आल्यानंतर संबंधित मुलीने मुलाविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवला. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार, फसवणूक केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. मार्च २०१५ मध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मे २०१५ मध्ये जेव्हा मुलीची गर्भधारणा झाल्याचे मुलाला कळले, तेव्हा त्याने मुलीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलाने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले, असे मुलीच्या वकिलांनी न्या. मृदुला भाटकर यांना सांगितले. ‘ज्या अर्थी महिलेने संबंध ठेवण्यास होकार दिला, म्हणजेच तिची ‘संमती’ होती,’ असे म्हणत न्या. भाटकर यांनी मुलाची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्याच्या जामिनावर सुटका केली, तसेच यापुढे मुलीशी संपर्क साधण्याचा किंवा तिला व तिच्या कुटुंबीयांची छळवणूक न करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)