शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

पुणेकरांना ‘फायरब्रॅँड’ नेत्याचे दर्शन

By admin | Updated: April 25, 2016 02:42 IST

तो बोलायला उभा राहिला आणि एका फायरब्रॅँड नेत्याचे दर्शन पुणेकरांना झाले. देश घडविण्याच्या विचारांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैचारिक टीका असूनही टाळ्यांच्या कडकडाटाने

पुणे : तो बोलायला उभा राहिला आणि एका फायरब्रॅँड नेत्याचे दर्शन पुणेकरांना झाले. देश घडविण्याच्या विचारांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैचारिक टीका असूनही टाळ्यांच्या कडकडाटाने आणि आझादीच्या घोषाने तरुणाई भारावून गेली. जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या रविवारच्या भाषणाची उत्सुकता गेल्या आठ दिवसांपासून होती. वेळ आणि ठिकाणांत झालेले बदल असूनही आज बालगंधर्व रंगमंदिर प्रेक्षकांनी भरून गेले होते. प्रवेश मिळाला नसल्याने संपूर्ण आवार गर्दीने भरून गेले होते. रस्त्यावर गर्दी होती. सभागृहात कधी टाळ्यांचा कडकडाट तर कधी कन्हैयाकुमारच्या संवेदनांनी पिनड्रॉप सायलेन्स, कधी त्याच्या भाषणाने डोळ्यात पाणी तर कधी त्याच्या आवेशाने वळल्या गेलेल्या मुठी हे चित्र पुणेकरांनी अनेक वर्षांनंतर अनुभवले. सुमारे पाऊण तास कन्हैयाकुमारच्या वाकगंगेचा प्रवाह सुरू होता. सकाळी झालेल्या हल्याची पार्श्वभूमी सांगून ‘पुणे की धरती गोडसे की है तो दाभोलकरकी भी है. जान देने के लिए यह धरती जानी जाती है’ असे म्हणून त्याने पुणेकरांची मने जिंकून घेतली. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात देशातील असमानता, विद्यार्थ्यांचे प्रश्न येथपासून ते सरकारची धोरणे आणि बेरोजगारांचा प्रश्न येथपर्यंत विवेचन केले. फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा जागर करत असताना खास शैलीत पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. मोदी यांच्यावरील प्रत्येक टीकेला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. मात्र, संयमित भाषणाचा प्रत्यय देत आपला मुद्दा मांडताना संदर्भ आला तरच मोदींचा उल्लेख करण्याचे पथ्यही त्याने पाळले. रोहित वेमुला, मराठवाड्यातील दुष्काळ, गोरगरीबांची दु:खे सांगताना तो भावनाविवश होत होता. प्रेक्षकही हेलावून जात होते. या देशात संवेदना, मानवता संपलीय का? असे त्याने विचारले त्यावेळी प्रेक्षकही अंतर्मुख झाले. ‘अंगुठा सिर्फ बटन दबाने के लिए नहीं, मुठ्ठी तनने के लिए भी होता है’ असे तो म्हणाला आणि सर्वांच्याच मुठी आपोआप वळल्या गेल्या. ‘हमें चाहिए आझादी...ब्राम्हणवाद से आझादी....पूंजीवाद से आझादी’, संघवाद की छातीपर....शाहू- फुले- आंबेडकर’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. प्रेक्षकही या घोषणांमध्ये सामील झाले.