पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परदेशी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन पीएच.डी. प्रवेश परीक्षेत इराणी विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्यांमध्ये तब्बल ३२ इराणी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच इराक व येमेनमधील प्रत्येकी ४ विद्यार्थी यात उत्तीर्ण झाले आहेत.परदेशातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशपरीक्षा पूर्वी विद्यापीठात येऊन द्यावी लागत होती. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने ही परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील वर्षी पहिल्यांदा ही परीक्षा आॅनलाइन झाली. ‘पदव्युत्तर अभ्यासक्रमांना इराणी विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त असते. त्यामुळे पीएच.डी.कडेही त्यांचाच ओढा अधिक दिसतो,’ असे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी सांगितले.
पीएच.डी. परीक्षेत इराणी डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 01:32 IST