शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘अ‍ॅप’ने ओलांडला लाखाचा टप्पा

By admin | Updated: March 6, 2016 01:13 IST

वीजपुरवठ्याशी संबंधित विविध सेवा देण्यासाठी व तक्रारींचे आॅनलाइन निराकरण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपला प्रतिसाद मिळाला आहे.

बारामती : वीजपुरवठ्याशी संबंधित विविध सेवा देण्यासाठी व तक्रारींचे आॅनलाइन निराकरण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपला प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच या अ‍ॅपने एक लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. या अ‍ॅपमुळे कोणत्याही वेळी वीजदेयकांचे अवलोकन, देयकभरणा, तक्रार नोंदणी आणि नंतर तक्रारीची सद्य:स्थिती आदींची माहिती घेता येते. विशेष म्हणजे, नव्या व्हर्जनमध्ये मराठी भाषेचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या अ‍ॅपमुळे मोबाईलवरून आॅनलाइन वीजदेयक पाहता येईल. देयकभरणा, तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्य:स्थिती पाहण्याबरोबर आॅनलाइन देयकही भरता येईल. त्यांच्या पावत्याही लगेच मिळू शकतील. महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. त्यावर ग्राहक क्रमांक दिल्यावर इंग्रजी अथवा मराठी हव्या त्या भाषेत माहिती उपलब्ध करून घेता येईल. या अ‍ॅपवरूनच ग्राहकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध तक्रारींसाठी कॉल सेंटरला फोन करता येईल. वीजसेवेशी संबंधित स्थानिक पातळीवर तक्रार स्वीकारणारी तक्रार निवारण केंद्रे गतवर्षीच बंद करण्यात आली होती. तक्रार नोंदविताना ग्राहकास आपला ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी तक्रार नोंदविता येते. या ठिकाणी आलेल्या तक्रारी केंद्रामार्फत संबंधित कार्यालयास वर्ग करून सोडविल्या जातात. मोबाइल अ‍ॅपवरून थेट तक्रार नोंदवता येते. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले गेले. या क्रमांकावर राज्यातील ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या मोबाईल अथवा दूरध्वनीवरून तक्रार नोंदविता येते. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या या अ‍ॅपचे उद्घाटन २७ आॅगस्ट २०१५ रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत अवघ्या सहा महिन्यांतच या अ‍ॅपने एक लाखहून अधिक डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या अ‍ॅपचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे