शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील एसटी आगारात बॉम्बचा स्फोट!

By admin | Updated: November 4, 2015 02:39 IST

वल्लभनगर एसटी आगारात मंगळवारी दुपारी एका बसखाली स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. जनावरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘लसणी’ बॉम्बचा हा स्फोट असल्याचा

पिंपरी : वल्लभनगर एसटी आगारात मंगळवारी दुपारी एका बसखाली स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. जनावरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘लसणी’ बॉम्बचा हा स्फोट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी आगारात बसगाड्यांची संख्याही मोठी आहे. दिवाळीच्या सुटीतील आरक्षणासाठी आलेल्या प्रवाशांमुळे स्थानकावर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. दुपारी ४च्या सुमारास दापोली-पिंपरी चिंचवड या बसखाली हा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने भीतीने नागरिकांची पळापळ झाली. स्फोट झाला त्या ठिकाणी थोडा धूर पसरला. बसखाली रक्त सांडलेले दिसले. त्या ठिकाणी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील कुत्रे दिसून आले. बाजूला काही अंतरावर एक पिशवीसुद्धा आढळली. त्यावरून ही पिशवी कुत्र्याने तोंडात धरून आणली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. थोड्याच वेळात बॉम्बनाशक पथकही दाखल झाले. जनावरे मारण्यासाठी लसणी बॉम्बचा वापर केला जातो तोच बॉम्ब असावा, असे पोलिसांनी सांगितले. आणखी आठ बॉम्बघटनास्थळावर दोन पिशव्या आढळल्या. त्यात आठ बॉम्ब आढळून आले. त्यातील सहा बॉम्ब बॉम्बनाशक पथकाकडे नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले, तर उर्वरित दोन तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत.