शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:07 IST

राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतक-यांना

अहमदनगर : राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतकºयांना द्यावा, अशा शब्दांत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली.उत्तर प्रदेशात कर्जमाफी चालते मग, मोदींना महाराष्टÑात याचा बोजा का वाटतो? असा सवालही त्यांनी भेंडा (ता. नेवासा) येथे संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार समारंभात केला.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे, जयंत पाटील, बबनराव पाचपुते तसेच यशवंतराव गडाख आदी उपस्थित होते.भाषणात पवारांनी क्रांतिसिंह नाना पाटलांची आठवण सांगितली. बीडमधून नाना पाटील हे लोकसभेवर विजयी झाले होते. मला निवडून दिल्यास तुमचं ‘फिटलं’ म्हणून समजा, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना गावोगावी दिले होते. त्या एका शब्दावर ते विजयी झाले. फडणविसांनीही सगळ्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे. तेव्हाच कर्ज ‘फिटलं’ असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.कालच केंद्र सरकारने उद्योजकांचे ८२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा नाही. शेतकºयांच्या कर्जमाफीची मात्र लगेच चर्चा होते. शेतमालाला भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाही.मात्र, सरकार दोन्ही गोष्टी करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली. नाशिकचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविता येईल. पण त्याबाबत केंद्र पातळीवर निर्णय होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.मी करंगळीचे माप शोधतोयनरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशला कर्जमाफीचे आश्वासन दिले व प्रत्यक्षात दिलीही. महाराष्टÑाची कर्जमाफी मात्र त्यांना ओझे वाटते. पंतप्रधानांचे धोरण हे राज्यानुसार कसे बदलते? हा प्रश्न आपणाला पडतो. हेच मोदी ‘पवारांची करंगळी पकडून आपण राजकारण करतो,’ असे सांगतात. त्यांच्या या म्हणण्यामुळे मी सध्या दररोज माझ्या करंगळीचे माप घेतोय, असा मिश्किल टोला पवार यांनी लगावला.आपण पवारांसोबत - राधाकृष्ण विखेआपल्याबाबत सर्व राज्यात उत्सुकता आहे. मात्र, काही होणार नाही, काळजी करू नका, असे राधाकृष्ण विखे भाषणात म्हणाले. माझ्याबाबत तुम्हाला कोणी काहीही सांगेल. पण आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते पवारांना उद्देशून म्हणाले.