शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप चालक 16 जून रोजी पुकारणार देशव्यापी संप

By admin | Updated: June 11, 2017 12:21 IST

देशभरातील पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - देशभरातील पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. 16 जूनपासून पेट्रोल पंप चालक देशव्यापी संप पुकारणार आहेत. 16 ते 24 जूनदरम्यान देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय डिलर्स असोसिएशननं जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात दररोज चढ-उतार होत असल्यानं दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे.तेल कंपन्यांनी देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी आणि पेट्रोल आणि डिझेलच्या चढ-उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे ऑइल कंपन्यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत 1 मेपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दर बदलण्याचा प्रयोग सुरू ठेवला आहे.  याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं हा प्रयोग आता संपूर्ण देशात राबविण्याचा विचार सरकार करत आहे. या बंदनंतरही केंद्राने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर 24 जूननंतरही बेमुदत बंदचा इशारा डिलर्सच्या असोसिएशननं दिला आहे.

16 जूनपासून रोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किमती

तत्पूर्वी भारतातील सर्व तेल कंपन्या 16 जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. म्हणजे संध्याकाळी ज्या किंमतीत पेट्रोल भरलं असेल त्याच किंमतीत तुम्हाला सकाळी पेट्रोल मिळेल याची काही शाश्वती नाही. याचाच अर्थ कधी पेट्रोल स्वस्त असेल तर कधी महाग. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.