ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३० : पेट्रोलच्या दरात ८९ पैशांनी तर डिझेलच्या दरात ४९ पैशांनी कपात करण्यात आली आहे. नव्याने आकारण्यता आलेले दर मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. दर कमी झाल्यामुळे दिल्लीत आता पेट्रोल ६४.७६ रुपयांनी तर डिझेल ५४.७ रुपयांनी मिळणार आहे. मागील १ जून रोजी पेट्रोलमध्ये २.५८ तर डिझेलमध्ये २.२६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना ही पेट्रोल कपात म्हणावी तसी समाधानकारक नाही. तरीही वाहन चालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल, डिझेल स्वस्त
By admin | Updated: June 30, 2016 22:32 IST