शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

पेट्रोल, डिझेल महागणार

By admin | Updated: February 16, 2016 03:45 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने यापासून मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली आहे़ याचा मोठा फटका पालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे़

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने यापासून मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली आहे़ याचा मोठा फटका पालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे़ त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी कच्च्या तेलावरील जकातीचा दर तीन टक्क्यांवरून ४़५ टक्के करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे़ यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे़पालिकेच्या उत्पन्नात जकात करातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा ४४ टक्के आहे़ यात ४० टक्के उत्पन्न कच्चा तेलाच्या जकातीपासून मिळते. मात्र गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किमती ११० डॉलर प्रति बॅरलवरून ३२ डॉलर एवढ्या खाली आल्या आहेत. जकात कर हा आयात केलेल्या मालाच्या किमतीवर आकारण्यात येत असल्यामुळे पर्यायाने जकातीचे उत्पन्नदेखील कमी झाले आहे़ जकातीचे १२०० कोटी रुपये उत्पन्न या आर्थिक वर्षात कमी जमा झाल्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे़ त्यामुळे कच्च्या तेलाच्या जकात करामध्ये वाढ करण्याचे संकेत अर्थसंकल्पातूनच आयुक्त अजय मेहता यांनी दिले होते़ त्यानुसार पंधरवड्यातच हा करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मंजुरीसाठी आणला आहे़ पालिका महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर ही करवाढ अमलात येणार आहे़ (प्रतिनिधी)2015-2016या आर्थिक वर्षात कच्च्या तेलाच्या जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात १२५० कोटींची घट आली. त्यामुळे कच्च्या तेलावरील जकात करात दीड टक्का वाढ करण्यात येणार आहे़ यातून पाचशे कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे़ पालिकेने शक्यता फेटाळली : कच्चे तेल मुंबईस्थित विविध रिफायनरीला पुरविले जाते व त्यापासून डिझेल, पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थांचे उत्पादन होत असते़ त्यामुळे या करवाढीचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या दरावर पडण्याची शक्यता आहे़ परंतु ही शक्यता पालिकेने सध्या तरी फेटाळून लावली आहे़