शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पेत्कोव्हिच, सीमोन उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 5, 2014 00:53 IST

रोमानियाच्या सीमोन हालेपने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पॅरिस : जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोव्हिचने इटलीच्या सारा इराणीचा तर रोमानियाच्या सीमोन हालेपने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पेत्कोव्हिच व सीमोन यांच्यादरम्यान फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीची झुंज रंगणार आहे. दुस:या उपांत्य लढतीत 2क्12 ची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोव्हाला कॅनडाच्या युज्नी बुकार्डच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे फ्रेंच ओपन 
टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज तीन तास उशिरा 
प्रारंभ झाले. आज कोर्ट फिलिप चार्टियरवर महिला 
विभागातील खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोव्हिचने इटलीच्या सारा इराणीचा 6-2, 6-2 ने सहज पराभव केला.  (वृत्तसंस्था)
 
शारापोव्हा ‘टी बॅग’; मरेच्या आईने केला उल्लेख
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागात सेरेना विलियम्स व ली ना यांच्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असले तरी जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू रशियाच्या मारिया शारापोव्हाची आगेकूच कायम आहे. ब्रिटनच्या अॅण्डी मरेची आई जुडी मरे हिने शारापोव्हाचा उल्लेख ‘टी बॅग’ असा केला. विम्बल्डन चॅम्पियन मरेची आई व ब्रिटिश फेड कप संघाचे कर्णधारपद भूषविणा:या जुडी यांनी टि¦ट केले की,‘शारापोव्हा एक टी बॅग प्रमाणो आहे. तिला गरम पाण्यात टाका त्यानंतर बघा ती कडक होते.’ 2क्12 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविणारी व गत उपविजेती शारापोव्हाने स्पेनच्या गार्बाईन मुगुरुजाचा पराभव करीत यंदाच्या मोसमात फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सामन्यानंतर पत्रकारांनी शारापोव्हाला जुडीबाबत विचारले असता तिने सर्वप्रथम जुडी कोण आहे, असा प्रतिप्रश्न केला.  चहाची चाहती असलेल्या शारापोव्हाने टी बॅग संबोधण्याचा अर्थ विचारला. मला याबाबत काही कळले नाही, असेही शारापोव्हा म्हणाली.  पत्रकारांनी शारापोव्हाला याचा अर्थ समजावून सांगितला. या इंग्रजी म्हणीचा अर्थ समजल्यानंतर शारपोव्हा म्हणाली,‘जुडी फारच कल्पक आहे. माझी प्रशंसा करण्यासाठी तिला अन्य शब्दांचाही वापर करता आला असता, पण तिने या इंग्रजी म्हणीचा वापर केला. शारापोव्हाला फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.