लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांलगत ५०० मीटरदरम्यान असलेली परमिट रूम व वाइन शॉप बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१६मध्ये दिला. मात्र राज्य सरकारने या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत राज्य मार्गावरीलही परमिट रूम आणि वाइन शॉप बंद केल्याने कोल्हापूर, सातारा व सांगली येथील ५०हून अधिक परमिट रूम व वाइन शॉप मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने नोटीस रद्द करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या याचिकांवरील सुनावणी सुटीकालीन न्यायालयापुढे होणार आहे.
वाइन शॉप मालकांची उच्च न्यायालयात याचिका
By admin | Updated: May 31, 2017 04:21 IST